अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:12 AM2021-01-22T04:12:15+5:302021-01-22T04:12:15+5:30

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. १७ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी ...

Molestation of a minor girl | अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

googlenewsNext

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. १७ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपी संतोष हरिभाऊ जाधव (३०, रा. वाईबोध) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

बसला अपघात, चालकाविरूद्ध गुन्हा

वरूड : तालुक्यातील ढगा गावालगतच्या नदीवरील पुलावरून एसटी बस कोसळून झालेल्या अपघातात २० ते २५ प्रवासी जखमी झाले होते. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी सुपचंद नरे यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी एमएच ४० क्यू ६०५६ या बसच्या चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

वरूडमधून ६५ हजारांचा ऐवज चोरीला

वरूड : येथील समतानगर भागातील रहिवासी विजयमाला डोंगरे यांच्या घरातून ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व एलईडी टीव्ही लंपास करण्यात आला. १७ जानेवारी रोजी रात्री ही घटना घडली. डोंगरे या पुसला येथे गेल्या असता, ही घटना घडली. वरूड पोलिसांनी १८ जानेवारी रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------

मोबाईलचोर मिळेनात, गुन्हा दाखल

दर्यापूर : बसस्थानक परिसरातील लक्ष्मी मोबाईल शॉपी व बनोसा येथील भाईजी मोबाईल शॉपीमधून २ लाख ४० हजार ७०० रुपयांचे मोबाईल लंपास करण्यात आले. १८ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. याप्रकरणी रोशन दीपक अग्रवाल (३५, रा.जीन प्लॉट, बनोसा) यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------------

दर्यापुरात तरूणावर हल्ला

दर्यापूर: येथील आनंदनगर भागातील रहिवासी रोहित अनिल गवई (२४) याचेवर चाकूहल्ला करण्यात आला. १८ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास कन्या शाळा क्रिडांगण परिसरात ही घटना घडली. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली. दर्यापूर पोलिसांनी संतोष समाधान वानखडे (३०, जानपूर), भारत इंद्रभान गवई (३२, माहुली धांडे), सागर वानखडे (३६, जानपूर) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

डांबरीकरण अर्धवट सोडले

शेंदुरजनाघाट : वरूड शेंदुरजना घाट या जुन्या पांदण रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले. मात्र अवघ्या ७०० मीटरचा रस्ता डांबरीकरण न करता अर्धवट सोडण्यात आला. केवळ ७०० मीटर डांबरीकरण करणे शिल्लक असल्याने यात राजकारण न करता ग्रामस्थांचे हित पाहावे, अशी विनंती शेंदुरजनाघाटवासियांनी केली आहे.

-----------

धारणीचे उपजिल्हा रुग्णालय सज्ज

धारणी : येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलाच्या उपचाराकरिता प्रसूती तज्ञ, सोनोग्राफीकरिता रेडिओलॉजिस्ट, सिझेरियन पद्धतीने प्रसुतीची सुविधा, एक्सरे, कुपोषित बालकां करिता पोषण पुनर्वसन केंद्र, नवजात शिशु दक्षता विभाग, बालरोग तज्ञ, ब्लड स्टोरेज युनिट, जनरल तपासणी सर्जिकल सुविधा, सर्वच प्रकारच्या रक्त तपासणीकरिता सुसज्ज लॅब या सह अनेक सेवा सुविधा करण्यात आल्या आहेत.

--------------

सौरउर्जा प्रकल्पाची रखडगाडी

अंजनगाव बारी : शेतकºयांना कृषीपंपासाठी कमी दराने वीज मिळावी, म्हणून अंजनगाव बारी येथे महावितरणमार्फत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार होता. त्यासाठी अंजनगांव बारी ग्रामपंचायतकडून ११ हेक्टर जागा देखील घेण्यात आली. सौरऊर्जा प्रकल्पासाठी सामग्री येऊन पडली. मात्र दोन वर्षांपासून प्रत्यक्षात कामास मात्र सुरूवात झालेली नाही.

---------------------

मालखेड पर्यटन स्थळी पर्यटकांची मांदियाळी

चांदुर रेल्वे : पर्यटकांच्या पसंतीत उतरलेले तालुक्यातील मालखेड तलाव येथील कृष्णाजी सागर पर्यटन स्थळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून बंद होते. आता ते पुर्ववत सुरू झाल्याने पर्यटक गर्दी करू लागले आहेत. त्यात बच्चेकंपनीचा अधिक सहभाग आहे.

---------------

जवळा-खरवाडी रस्त्याची थातुरमातूर दुरूस्ती

चांदुर बाजार : तालुक्यातील अपूर्ण अवस्थेत असलेला जवळा-खरवाडी हा रस्ता काही महिन्याअगोदार पूर्ण झाला. परंतु या नव्या कोºया रस्त्याला आताच खड्डे पडले आहेत. जवळ्याहून खरवाडीला येत असताना नाल्यावरील पुलावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे पुलावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

-------------

ेजंगलातून मौल्यवान झाडांची तस्करी

वरूड : महाराष्ट्राच्या सीमेवर सातपुडा पर्वताच्या विशालकाय रांगा असून या पर्वतावरील हरीत वनसंपदा नष्ट होत आहे. जंगलात असलेल्या सागवान, निलगिरी, निंब, आंबा, शिवण या औषधी मौल्यवान झाडांची डोळ्यादेखत तस्करी होत आहे. या गंभीर प्रकाराकडे वनाधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याने तस्करी करणाºयांचा मार्ग सुकर होतो आणि यामुळेच पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.

-------------

पांदण रस्त्यासाठी नव्याने आराखडा

अचलपूर : महसूल विभागात २४ ब वर्ग पांदण रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली. या ब वर्ग पांदण रस्त्यात शेतकºयांकडून लोकवर्गणी घेण्यात आलेली नाही. या पांदण रस्त्याच्या कामात केवळ मातीकाम घेवून दबाई करण्यात आली आहे. पांदण रस्त्याकरीता नव्याने आराखडा वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याची माहिती जि.प.बांधकाम विभागाने दिली.

--------------

मोर्शी येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम एसडीओ आवारात

अमरावती : मोर्शी तालुक्यातील २६ जानेवारी रोजीचा ध्वजारोहण समारंभ उप विभागीय कार्यालयाच्या आवारात सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. याअनुषंगाने तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच महाविद्यालय, शाळेचे मुख्याध्यापक व समस्त नागरिकांनी याबाबत नोंद घेण्याचे आवाहन मोर्शीचे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांनी केले आहे.

------------

Web Title: Molestation of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.