शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाचा राष्ट्रीय पुरस्कार अमरावती जिल्ह्याला जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 21:44 IST

पुरस्काराचे वितरण नवी दिल्लीच्या सुब्रमण्यम सभागृहात १९ ते २० डिसेंबरला होणार आहे

 अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अमरावती जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण नवी दिल्लीच्या सुब्रमण्यम सभागृहात १९ ते २० डिसेंबरला होणार आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील पुरस्कारासाठी मनरेगा आयुक्तालय नागपूर यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यातून सदर पुरस्कारासाठी अमरावतीसह यवतमाळ, गोदिंया, गडचिरोली या चार जिल्ह्यांचे नामांकण सादर करण्यात आले होते. त्यानुसार दिल्ली येथे अवार्ड समितीसमोर सादरीकरणासाठी जिल्ह्याची निवड करून बोलविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तत्कालीन सीईओ मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त जिल्हाधिकारी मिताली सेठी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी माया वानखडे यांनी अंमलबजावणीचे सादरीकरण २९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे केले होते. त्या आधारे केंद्र सरकारच्या चमूने ७ डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील भातकुली, चिखलदारा, चांदूर बाजार या तीन तालुक्यांत प्रत्यक्ष भेट देऊन रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली.अमरावती जिल्ह्याला सन २०१८-१९  या वर्षात ७८ लाख ८१ हजार मनुष्य दिवसाचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात जिल्ह्याने ८४ लाख ८४ हजार दिवसांत उद्दिष्ट (१०७ टक्के) साध्य केले. त्या वर्षात जिल्ह्यात या योजनेवर एकूण २३० कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्या वर्षात २ लाख ६ हजार ३७७ व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. अमरावती जिल्ह्याने रोजगार हमी योजनेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात केला आहे.कोटमनरेगात जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाली, ही अभिमानाची बाब आहे. या पुरस्कारापेक्षा जास्तीत जास्त लोकांना रोजगातून लाभ देऊ शकले, याचे समाधान आहे. याकरिता सर्वांचे सहकार्य लाभले.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावतीकोटजिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केलेल्या कामांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार झाल्याचा आनंदच असून, अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.- माया वानखडे,उपमुख्यकार्यकारी अधिकारी रोहयो विभाग झेडपी अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती