शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचा शब्द मिळाला अन् दिव्यांग रजनीला गहिवरून आले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 17:56 IST

भंडाऱ्याच्या दिव्यांग मुलीसाठी आ. बच्चू कडू यांचा पुढाकार

चांदूर बाजार (अमरावती) : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सर्व आमदार सभागृहात उपस्थित होते. आमदार बच्चू कडू मात्र सभागृहात हजेरी लावून थेट भंडारा जिल्ह्यातील अपंग मुलीला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे त्या मुलीला घेऊन गेले. नुसते गेलेच नाही तर ९० टक्के दिव्यांग असलेल्या तिला शासकीय आर्थिक मदत व नोकरीचे आश्वासन ही मिळवून दिले. दिव्यांगांसाठी लढणाऱ्या बच्चू कडू नावाच्या या कार्यकर्त्याचे जेव्हा त्या मुलीने आभार मानले तेव्हा तिला गहिवरून आले होते.

भंडारा जिल्ह्यातील तीन बहिणींची ही व्यथा आहे. वडिलांचा २०१७ मध्ये मृत्यू झाला. तर दोन वर्षांनी आईलाही देवाज्ञा झाली. तिन्ही बहिणी निराधार झाल्या. आई साकोली येथे जलसंपदा विभागत शिपाई म्हणून कार्यरत होती. नोकरीत कार्यरत असतानाच आईचा मृत्यू झाला. बहिणींपैकी सर्वात लहान बहीण,९० टक्के अपंग आहे. तिला आईच्या जागेवर, अनुकंपा अंतर्गत नोकरी देण्याची शासनाला विनंती केली. परंतु संबंधित विभागाने साधी दखलही घेतली नाही.

शासनाकडे वारंवार दाद मागून ही त्यांना न्याय मिळत नव्हता. अखेर त्यांनी दोन महिन्यांपूर्वी बच्चू कडू भंडारा दौऱ्यावर असताना आपण न्याय मिळवून देऊ,असा शब्द कडू यांनी दिला. त्यानुसार २० डिसेंबर रोजी या बहिणींना,नागपूर येथे बोलावून घेतले. अधिवेशनात सभागृहात न थांबता कडू यांनी जलसंपदाचे अपर सचिव कपूर यांची भेट घेतली. त्यांना या मुलींची व्यथा समजावून सांगितली. अखेर अपर सचिवांनी, ९० टक्के अपंग रजनी मानकर हिला जलसंपदात नोकरी देण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे यापूर्वी जलसंपदा राज्यमंत्री असताना या अपंग मुलीला,डीसीपीएस मधून १० लक्ष रुपयांची मदत मिळवून दिली होती. अधिवेशनातील कामकाज नंतर,आधी अपंगाला आधार याचा प्रत्यय आ. कडू यांच्या कृतीतून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूjobनोकरी