शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जातीय सलोख्यासाठी ‘मिशन सर्वधर्म समभाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 10:44 IST

अमरावतीतील परिस्थिती आटोक्यात आणून जातीय सलोखा टिकविण्यासाठी शहर आयुक्तालय क्षेत्रात ‘मिशन सर्वधर्म समभाव’ राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात बुधवारी पटवा चौकातील प्रभाकरराव वैद्य यांच्या संबोधनाने करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : शुक्रवार व शनिवारी लागोपाठ घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण झाला. ती परिस्थिती आटोक्यात आणून जातीय सलोखा टिकविण्यासाठी शहर आयुक्तालय क्षेत्रात ‘मिशन सर्वधर्म समभाव’ राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात बुधवारी पटवा चौकातील प्रभाकरराव वैद्य यांच्या संबोधनाने करण्यात आली. 

शहरातील ज्या भागात हिंसाचार उफाळला, लोक आमनेसामने ठाकले, अशा संवेदनशील ठिकाणी, विविध धर्मगुरू विशेषत: तरूणाईला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हिंदू, मुस्लिम, शिख. इसाई या धर्मगुरूंसोबतच समाजातील प्रभावशाली व्यक्तींचा त्यात समावेश आहे. हिंसाचाराच्या परिणामावर यात समुपदेशन केले जाईल. संवेदनशील भागातील सर्व समुदायांचे प्रतिनिधी, पोलिसांचा समावेश असलेले व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून अफवा पसरिवणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याचा मानसदेखील पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी व्यक्त केला. 

आज ११ ते ५ शिथिलता

संचारबंदीमध्ये गुरूवारी ११ ते ५ अशी शिथिलता देण्यात येणार आहे. त्यात जीवनावश्यक वस्तू, पेट्रोलपंप सुरू राहतील, सोमवारपर्यंत शिथिलतेमध्ये वाढ करण्यात येणार आहे. मेडिकल २४ बाय ७ सुरू असतील.सध्या १५०० पोलीस रस्त्यावर आहेत. कुणीही अफवा पसरवू नका. अफवेला बळी पडुू नका. दोन्ही दिवसांतील घटनांच्या अनुषंगाने अटकसत्र चालू आहे. कुणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही.- डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त

टॅग्स :Socialसामाजिक