शहरं
Join us  
Trending Stories
1
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
2
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
3
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
4
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
5
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
6
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
7
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
8
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
9
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
10
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
11
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
12
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
13
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
14
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
15
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
16
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
17
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
18
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
19
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
20
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडी कवितेची 'मिर्झा एक्स्प्रेस' थांबली; डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:51 IST

Amravati : यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा हे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील परतवाडा रोडवरील नवसारी परिसरात "मिर्झा एक्स्प्रेस" या निवासस्थानी त्यांचे वास्तव्य होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वन्हाडी मातीचा सुगंध आपल्या काव्यातून जगभर पसरविणारे कविवर्य, 'मिर्झा एक्स्प्रेस' फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे २८ नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी ६:३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्या निधनाने माणूसपण जागविणाऱ्या साहित्याला रसिकजन पोरके झाले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा हे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील परतवाडा रोडवरील नवसारी परिसरात "मिर्झा एक्स्प्रेस" या निवासस्थानी त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, मेहजबी व हुमा या दोन कन्या आहेत. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगाह कब्रस्तानात दुपारी अंत्यसंस्कार झाले. या वेळी शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लक्षणीय होती.

विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग वन्हाडी काव्यशैलीच्या खुमासदार सादरीकरणासाठी जगभरात प्रसिद्ध होते. वयाच्या ११ व्या वर्षापासून त्यांनी कवितालेखनाला सुरुवात केली होती. १९७० पासून त्यांनी मंचावर कविता सादर करायला सुरुवात केली. पुढील ५० वर्षे विदर्भ, मराठवाड्यातील कविसंमेलनाचे ते केंद्रबिंदू ठरले. त्यांचे एकूण २० काव्यसंग्रह आहेत. वृत्तपत्रातील विविध स्तंभांतून लेखनही त्यांनी केले. त्यांचा 'मिर्झाजी कहीन' हा स्तंभ लोकप्रिय ठरला होता. 'मिर्झा एक्स्प्रेस' या नावाने अफलातून किस्से आणि कवितांचा कार्यक्रम प्रसिद्ध होता. त्याचे सहा हजारांवर प्रयोग झाले आहे. 'मोठा माणूस', 'सातवा महिना', 'उठ आता गणपत', 'जांगडबुत्ता' अशा त्यांच्या कितीतरी कविता लोकप्रिय झाल्या. "जांगडबुत्ता" या शब्दाचे ते जनक आहेत.

विदर्भातील ख्यातनाम संत फकीरजी महाराज या मंदिर ट्रस्टचे ते विश्वस्त होते. त्यांचे वडील मिर्झा रज्जाक बेग ऊर्फ भाईजी हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रभावी राजकीय सामाजिक व्यक्तिमत्त्व होते. नागपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ फिरदोस मिर्झा हे त्यांचे चुलतबंधू आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Poet 'Mirza Express' Dr. Mirza Rafi Ahmed Beg Passes Away

Web Summary : Renowned Marathi poet Dr. Mirza Rafi Ahmed Beg, known as 'Mirza Express', passed away at 68 due to kidney ailment. He was famous for his Varhadi style poetry and contributed significantly to Marathi literature through poems and columns.
टॅग्स :Amravatiअमरावती