फोटो -
चांदूर रेल्वे : तालुक्यातील कळमगाव येथे कथित चमत्कारी गुणवंतबाबा उदयास आला आहे. त्यामुळे कळमगाव येथील झोपडपट्टी येथे अनेक महिलांची व पुरुषांची गर्दी पहावयास मिळत आहे.
कोरोनासारख्या महाभयंकर आजारांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज असताना स्थानिक प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गुणवंतबाबांचा साक्षात्कार झाल्याच्या भोळसट कल्पनेतून कळमगाव येथील झोपडपट्टी परिसरात एका युवाकभोवती भक्तांचा मेळावा पाहावयास मिळत आहे. यामध्ये स्त्रियांची लक्षणीय उपस्थिती आहे. प्रसेनजित वामनराव मेश्राम (१८) असे या युवकाचे नाव आहे. त्याचे मांजरखेड कसबा येथे बारावीपर्यंत शिक्षण झाले. सैन्य दलात भरती व्हायचे असल्याने तो परिश्रम घेत होता. परंतु, त्यात यश आले नाही. त्याला मोठ्या आजाराने ग्रासले होते. खिरसना निरसाना येथील नातेवाइकांनी मसला येथे देवीच्या दरबारात नेऊन त्याच्यावर उपचार केले. हा गुणवंतबाबांचा चमत्कारिक पुरुष असल्याचे सांगत, बाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा, असे तेथील कथित देवीने सांगितले. अशा चमत्कारी बाबाची माहिती सरपंच व पोलीस पाटील यांना मात्र नाही. गर्दी होत असतानाही पोलीस प्रशासनाला कुणी कळविले नाही. विज्ञानाची कास धरणारे प्रशासन व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
230921\img-20210923-wa0003.jpg~230921\1228-img-20210923-wa0004.jpg
photo~photo