शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

अल्पवयीन मुलींचे अपहरण, बलात्कार प्रकरण : दोघांना दहा वर्षांची, तर एकाला पाच वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 19:33 IST

दहावीच्या पेपरला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन प्रकरणांमध्ये दोघांना दहा वर्षांची, तर त्यांना मदत करणा-या एका तरुणास पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

अमरावती : दहावीच्या पेपरला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन प्रकरणांमध्ये दोघांना दहा वर्षांची, तर त्यांना मदत करणा-या एका तरुणास पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. राहुल ऊर्फ गोलू राजू रावेकर (२४), संदीप रामदास रावेकर (२४), मंगेश विष्णू कुकडे (२४, सर्व रा. वाठोडा शुक्लेश्वर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश (२) एस.डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयाने बुधवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. खोलापूर (ता. भातकुली) येथे १५ वर्षीय मुलगी २४ मार्च २०१४ रोजी दहावीच्या पेपरसाठी गेली होती. मंगेश कुकडे याने तिला दुचाकीवर बसवून मूर्तिजापूर मार्गे अकोला येथे राहुलजवळ पोहचविले. राहुलने तिला ठाणे, सुरत शहरात फिरवून अहमदाबादला नेले. तेथे खोली भाड्याने करून लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात राहुलला नीलेश रावेकर, शुभम रावेकर व मंगेश यांनी मदत केली. पीडिताच्या वडिलांनी दुसºयाच दिवशी खोलापूर पोलीस ठाण्यात मुलगी पळविल्याची तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.आर. ताले यांनी चौकशी पूर्ण करून १४ नोव्हेंबर २०१४ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी अभियोक्ता प्रशांत देशमुख यांनी न्यायालयात सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने राहुल व मंगेशला भादंविच्या कलम ३६३ अन्वये तीन वर्षे कैद, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्याचा अतिरिक्त कारावास, कलम ३६६ (अ) अन्वये पाच वर्षे कैद, एक हजाराचा दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. राहुलला भादंविच्या कलम ३७६ (२) नुसार दहा वर्षे कारावास आणि दोन हजारांचा दंड  व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. शुभम व नीलेश यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. अन्य एका प्रकरणात १६ वर्षीय मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत २४ मार्च २०१४ रोजी दहावीच्या पेपरसाठी भातकुली येथे गेली होती. पेपर संपल्यानंतरही ती घरी न परतल्याने वडिलांनी २५ मार्च रोजी पोलिसांत तक्रार नोंदविली. भातकुली पोलिसांनी संदीप रामदास रावेकर (२५, रा. वाठोडा शुक्लेश्वर) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा नोंदविला. पोलीस चौकशीदरम्यान भाऊ दिलीप (३०) याने राहुलच्या बँक खात्यात पाच हजार रुपये टाकल्याचे पुढे आले. पोलिसांनी चौकशी करून संदीप रावेकर व राहुल रावेकर यांना अहमदाबादवरून अटक केली. त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन मुलीसुद्धा होत्या. चौघांनाही घेऊन पोलिसांनी अमरावती गाठले. मुलींच्या बयाणावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७६, १२० (ब), १०९, पोक्सो कलम ४, ६, १२ अन्वये गुन्ह्यात वाढ केली. पोलिसांनी चौकशी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी अभियोक्ता मिलिंद जोशी यांनी न्यायालयात चार साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपी संदीपला कलम ३७६ अन्वये दहा वर्षांची कैद, दोन हजारांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास ठोठावला. याप्रकरणात दिलीप रावेकर यांची निर्दोष सुटका करण्यात आली. या दोन्ही प्रकरणात पोलीस विभागातर्फे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी म्हणून मनोज भोंडे यांनी कामकाज पाहिले. 

संदीप रावेकर पूर्वीच्या एका प्रकरणात भोगतोय शिक्षासंदीप रावेकर याच्याविरुद्ध २०१३ मध्ये छेडखानीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्याला न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. सोबत २१ हजारांचा दंडसुद्धा ठोठावण्यात आला होता. त्यामुळे तो कारागृहात शिक्षा भोगत असून, बुधवारी झालेल्या न्यायालयीन निर्णयात आता दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

टॅग्स :jailतुरुंग