शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आश्रमशाळेत कोरकू, पारधी भाषेतून पहिली-दुसरीचे शिक्षण, मंत्री विजयकुमार गावित यांची घोषणा

By गणेश वासनिक | Updated: April 17, 2023 18:33 IST

येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

अमरावती : आदिवासी, पारधी समाजातील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी, यासाठी त्यांच्याच बोली भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याअनुषंगाने येत्या शैक्षणिक वर्षात पहिली आणि दुसरीचे शिक्षण कोरकू, पारधी भाषेतून दिले जाईल, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सोमवारी येथे केली.

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पारधी-फासेपारधी समाज जनजागृती मेळाव्याच्या उद्‌घाटनाप्रसंगी ना. गावित बोलत होते. यावेळी मंचावर खासदार नवनीत राणा, डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार रमेश बुंदिले, रमेश मावस्कर, संजय हिंगासपुरे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, धारणीचे प्रकल्प अधिकारी सावनकुमार, बाबुसिंग चव्हाण, मतीन भोसले, सलिम भोसले, रंजिता भोसले आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. गावित म्हणाले, आदिवासी आश्रमशाळांमध्ये स्थानिक बोली भाषेतून पहिली आणि दुसऱ्या वर्गात विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. एवढेच नव्हे तर ऑडिओ, व्हिडीओद्वारे शिक्षण देताना आदिवासी, पारधी समाजाच्या मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा या उपक्रमामागे हेतु आहे. काेरकु, पारधी भाषेचे शिक्षण देण्यासाठी स्थानिक शिक्षकांनाच प्राधान्य देण्यात येईल. परंतु आदिवासी, पारधी महिलांनी आपली मुले आश्रमशाळा, वसतिगृहात शिक्षणासाठी गेली पाहिजे, याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन ना. गावित यांनी स्पष्ट केले.

ॲपद्वारे माहिती जाणून घेणार

आदिवासी विकास विभागात विविधांगी योजना, उपक्रम राबविले जातात. त्याकरिता आता आदिवासी मुलांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, स्वयंरोजगार आदींबाबत एका ॲपद्वारे माहिती गोळा केली जाणार आहे. आवडी-निवडीनुसार एक किंवा दोन महिन्यात संबंधितांना प्रशिक्षण दिले जाईल. पारधी समाजाच्या घरकुलाचा प्रश्न सोडविला जाणार असून, येत्या दोन वर्षात एकही पारधी घरकुलविना राहणार नाही असे, असे ना. गावित यांनी सांगितले.आवडेल ते करा, मागेल ते देवू

पारधी समाज आता रस्त्यावर भीक मागताना नव्हे तर शिक्षण, रोजगार, नोकरीदार, व्यावसायीक झाला पाहिजे. म्हणून आवडेल ते करा, मागेल ते देवू, अशी संकल्पना आदिवासी विकास विभागाची आहे. महिलांनो बचत गट तयार करा. येत्या तीन महिन्यात  साहित्य, धनादेश वाटप करू, असे आश्वासन ना गावित यांनी दिले.

टॅग्स :Educationशिक्षणTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाVijaykumar Gavitविजय गावीतAmravatiअमरावती