लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या लोकपयोगी राहुटीला शहरात, सोमवार १० फेबु्रवारीला, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साडेचार हजार नगारिकांनी तेथे आपल्या कैफियत मांडल्यात. अनेकांना जागेवरच दिलासा मिळाला.परतवाडा शहरातील नेहरू मैदानावर प्रभाग क्र. १ ते ६ च्या तक्रारी या राहुटीत ऐकल्यानंतर दुपारी ३ वाजता हीच राहुटी अचलपूर बाजार समितीच्या आवारात थाटण्यात आली. प्रभाग क्र. ७ ते १० मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्यात. यात अनेकांना तात्काळ रेशनकार्ड व प्रलंबित पीआर कार्ड वितरित करण्यात आले. राज्यमंत्र्यांनी खुद्द पूर्ण वेळ दोन्ही ठिकाणी आपली उपस्थिती दर्शविली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्यात. दोन्ही ठिकाणी शासनाचे सर्व विभाग तैनात होते. प्रहारचे अंकुश जवंजाळ, संजय जयस्वाल, अनिल पिंपळे, शाम मालू, सतीश व्यास, बल्लू जवंजाळ, भाष्कर, बंटी खानझोडे, नीलेश लायस्कर, हरिश्र्चंद्र मुगल आदींनी गरजूंना सहाकार्य केले.
राज्यमंत्र्यांची राहुटी परतवाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST
साडेचार हजार नगारिकांनी तेथे आपल्या कैफियत मांडल्यात. अनेकांना जागेवरच दिलासा मिळाला. परतवाडा शहरातील नेहरू मैदानावर प्रभाग क्र. १ ते ६ च्या तक्रारी या राहुटीत ऐकल्यानंतर दुपारी ३ वाजता हीच राहुटी अचलपूर बाजार समितीच्या आवारात थाटण्यात आली. प्रभाग क्र. ७ ते १० मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्यात.
राज्यमंत्र्यांची राहुटी परतवाड्यात
ठळक मुद्देसाडेचार हजार नागरिकांची हजेरी : वनविभागाचे अनुदान चर्चेत