शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्री बच्चू कडू तिसऱ्यांदा विलगीकरणात, ताप अंगदुखी असल्यानं केली टेस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 07:42 IST

बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना पुढील 3 दिवस कुणीही मला न विचारता भेटण्यासाठी येऊ नये, असे म्हटलंय. तसेच, ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली असून ती निगेटिव्ह आली आहे.

ठळक मुद्देबच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना पुढील 3 दिवस कुणीही मला न विचारता भेटण्यासाठी येऊ नये, असे म्हटलंय. तसेच, ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली असून ती निगेटिव्ह आली आहे.

अमरावती/मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे राज्यातील कोरोना रुग्णांसंख्या वाढल्याने राज्यात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची दुसऱ्यांदा बाधा झाल्याचे समोर आले होते. तर, राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील दोनवेळा कोरोना होऊन गेला आहे. आता, पुन्हा एकदा त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना पुढील 3 दिवस कुणीही मला न विचारता भेटण्यासाठी येऊ नये, असे म्हटलंय. तसेच, ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली असून ती निगेटिव्ह आली आहे. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम आवश्यक असल्याने पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे, असे ट्विट कडून यांनी केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी दोनवेळा बच्चू कडू यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यावेळी, विलगीकरणात जाऊन उपचार घेतल्यानंतर ते बरे झाले होते. 

फेब्रुवारी महिन्यात कोरोना पॉझिटीव्ह

"माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी" असं आवाहन बच्चू कडू यांनी 19 फेब्रुवारी रोजी ट्विट करुन केलं होतं. अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, 19 फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता.  

15 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार येत्या १५ एप्रिलपर्यंत पुन्हा काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. रविवारी रात्री ८ वाजेपासून जमावबंदी लागू करताना ती मोडल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. गर्दीच्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल. विनामास्क फिरल्यास पाचशे रुपये दंड पडेल. रात्री ८ पासून ते सकाळी ७ पर्यंत या जमावबंदी लागू असल्याच्या काळात उद्याने, समुद्रकिनारे, मॉल्‍स, सर्व सिनेमागृहे, रेस्‍टॉरंट  बंद राहणार आहेत. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस