शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘मिलिपीड'मुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा भागात मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला तुरळक भागात असणाऱ्या अळीचा पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. दोन वर्षांपासून या अळ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. चांदूर बाजार तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जातात.

ठळक मुद्देअंकुरलेल्या पिकांना धोका : दुबार पेरणीचे संकट, पीक उत्पादनात मोठी घट

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : चांदूर बाजार तालुक्यात पेरणी केलेल्या बियाण्यांना अंकुर आले खरे; परंतु, अंकुर खाऊन टाकणाऱ्या मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीने आसेगावपूर्णा परिसरात उच्छाद मांडला आहे. या अळीच्या प्रादुभार्वामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, तर दुसरीकडे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा भागात मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला तुरळक भागात असणाऱ्या अळीचा पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. दोन वर्षांपासून या अळ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. चांदूर बाजार तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जातात. सध्या पेरणीची लगबग सुरू असताना आसेगाव पूर्णा शिवारात या अळ्यांच्या मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या भागात जवळपास शेकडो एकर परिसरात मिलिपिडी प्रजातीच्या अळ्या दिसून येत आहेत. त्यामुळे नुकतेच अंकुरलेल्या खरीप पिकांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. शेतात दिसणाºया गोगलगायसदृश अळीने शेतकºयांना 'सळो की पळो' करून सोडले आहे. ही अळी जवळपास अडीच ते तीन इंच लांब आकाराची असून, तिला ग्रामीण भागात पैसा या नावाने ओळखले जाते. शेतकºयांना मोठ्या उत्पन्नाची आशा असताना दरवर्षी या अळीमुळे उत्पन्न निम्म्यावर येत आहे.तीन - चार वर्षांपासून या मिलिपिड (पैसा) अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या अळ्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर उपाययोजना करण्यासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.उपाय करूनही यावर नियंत्रण येत नाही. त्यांनी सोयाबीन, कापूस यासह तेलवर्गीय पिकांना लक्ष्य केले असून, त्यांचे मुख्य खाद्य पाला व शेंगा हे असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.- राजेंद्र नवले,शेतकरी, आसेगाव पूर्णाएकीकडे दोन-तीन दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असून, दुसरीकडे पैसा अळीने पिकावर आक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी कृषी विभागाने संशोधन करून ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच्या उत्पादनापासून वंचित रहाावे लागेल.- मोहन नेरकर,शेतकरी, आसेगाव पूर्णा

टॅग्स :Farmerशेतकरी