लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : उन्हाळ्याच्या मोसमात लिंबाची मागणी वाढून या पिकाला चांगला भाव मिळत असतो. पण, यंदा लॉकडाऊनमुळे सरबतची दुकाने, रसवंती, हॉटेल व बाजारपेठ बंद असल्याने लिंबाची मागणी कमी होऊन भाव कोसळले. लाखोंचे पीक कवडीमोल भावात गेले. लिंबूउत्पादक शेतकरी यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.तालुक्यात माहुली चोर येथे सर्वात जास्त लिंबाचे बगीचे असून, लाखो रुपयांची उलाढाल होत असते. पण, यंदा भर उन्हाळ्याच्या मोसमातही त्यांना भाव मिळाला नाही. दरवर्षी उन्हाळ्यात सरासरी ४० ते ५० रुपये प्रतिकिलो भाव मिळत असतो. एका कट्ट्यामध्ये सुमारे १५ ते १८ किलो लिंबूची भरती भरून बाजारात पाठविले जाते. सुमारे ६०० ते ८०० रुपये प्रतिकट्टा भाव मिळत होता. पण, यंदा १० ते १५ रुपये किलोच्या आतच भाव मिळाला. तोडीचा व वाहतूक खर्च मात्र वाढला. पावसाळ्यापूर्वी झाडावर असलेली लिंबं तोडून शेतकऱ्यांना बगीचे खाली करावे लागतात. पावसाळ्यातील बहर झाडावर फुटण्यासाठी ही तोड करणे गरजेचे असते. बऱ्याच शेतकऱ्यांच्या झाडावर अद्यापही लिंबूचा माल तयार असून, त्याची तोड व्हायची आहे.शेतातील बागेत लिंबाची एक हजार झाडे आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अल्प दर मिळाला. त्यातही मागणी कमी व बाजारपेठ नसल्याने मिळकतीत बरीच घट झाली.-अंकुश झंझाट,शेतकरी माहुली चोरमागील वर्षी उन्हाळ्यात दीड लाखांचा बहर विकला होता. यंदा झाडावर फळे जास्त, मात्र केवळ ५० हजार रुपये गाठीशी आले. कोरोनाचा फटका बसला.-प्रणय सव्वालाखेशेतकरी, मंगरूळ चव्हाळा
लाखोंचे लिंबू पीक कवडीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST
माहुली चोर येथे सर्वात जास्त लिंबाचे बगीचे असून, लाखो रुपयांची उलाढाल होत असते. पण, यंदा भर उन्हाळ्याच्या मोसमातही त्यांना भाव मिळाला नाही. दरवर्षी उन्हाळ्यात सरासरी ४० ते ५० रुपये प्रतिकिलो भाव मिळत असतो. एका कट्ट्यामध्ये सुमारे १५ ते १८ किलो लिंबूची भरती भरून बाजारात पाठविले जाते. सुमारे ६०० ते ८०० रुपये प्रतिकट्टा भाव मिळत होता.
लाखोंचे लिंबू पीक कवडीमोल
ठळक मुद्देबाजारात दर घसरले : कोरोनाचा फटका, शेतकरी अडचणीत