शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

मेळघाटातील कोट्यवधीचे सागवान लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:07 IST

मेळघाटातील कोट्यवधीचे सागवान चोरट्यांनी लंपास केले. या लाकडासोबतच डिंक, लाख, चारोळी, सांबराच्या शिंगाचीही तस्करी केली जात आहे.

ठळक मुद्देआंध्र प्रदेश, कर्नाटकात तस्करी : डिंक, लाख, चारोळी, सांबराची शिंगेही पाठविली जातात

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटातील कोट्यवधीचे सागवान चोरट्यांनी लंपास केले. या लाकडासोबतच डिंक, लाख, चारोळी, सांबराच्या शिंगाचीही तस्करी केली जात आहे.पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत घटांग, दहिगाव, जारिदा वनपरिक्षेत्रात वनतस्करांनी हैदोस घातला आहे. यातील एकही बीट सुरक्षित नाही. घटांग वनपरिक्षेत्रातील बिहाली, भवई, भुलोरी, सलोना, मसोंडी व घटांग, जारिदा वनपरिक्षेत्रातील लाखेवाडा, बोदू, खारी, कारंज, चोबीदा, बिबा, राहू, एकताई, तर दहिगाव रेंजमधील चिंचोना, सक्ती, खिरपानी, पांढराखडक, सावरपाणी, पूर्व खैरकुंड, पश्चिम खैरकुंड, टेम्ब्रुसोंडा, गिरगुटी, अंबापाटी, खोंगडा या बीटमध्ये अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात आहे. सक्ती, चिंचोना, पांढराखडक, खिरपाणी बीटमध्ये तर चोरट्यांनी हैदोस घातला आहे.सागवान तस्करांचे एजंट सातपुडा व मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या गावागावांमध्ये कार्यरत आहेत. वनतस्कर त्यांच्याकडे आवश्यक लाकडाची आॅर्डर नोंदवितात. एजंट वृक्षतोड करणाऱ्या टोळीकडून जंगलातील सागवानची अवैध वृक्षतोड करून घेतो. तोडलेला हा माल गोळा करून तो संबंधितांना पुरविला जातो. यात ‘दादू’ दलालाची चांगलीच चर्चा आहे. हे दलाल मोबाइलवरही आॅर्डर घेतात. वृक्षतोडीकरिता १५ ते २० लोकांच्या टोळी राबते.आडजात - बदली पासआंध्र प्रदेश आणि कर्नाटकात कडुनिंब आणि ुबाभळीच्या लाकडाला मागणी असते. अंजनगाव, परतवाडा, चांदूरबाजार येथून हे आडजात लाकूड मोठ्या ट्रकमध्ये पाठविले जाते. या आडजात लाकडासोबत संत्रा, केळी आणि कांद्याच्या ट्रकमधून या सागवान लाकडाची तस्करी केली जाते. याकरिता विशिष्ट पद्धत अवलंबिली जाते. या सागवान लाकडाची तस्करी करताना बदली पासचाही वापर केला जातो. ट्रकसोबत असलेल्या टीपीवरील माल व वन कार्यालयात असलेल्या टिपीवरील नोंदल्या गेलेल्या मालात मोठी तफावत राहते. यात कोºया टीपीचाही वापर होतो. आडजातच्या टीपीवरही सागवानची तस्करी केली जाते. बदली पास व हॅमरमध्येही तफावत असल्याचे वनविभागातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.चक्री मशीनजंगलात तोडून व तेथूनच सोलून आणलेल्या या लाकडावर ९ इंची, २४ इंची चक्री मशीनवर संस्कार केले जातात. वेळप्रसंगी रंधा मशीनचाही वापर होतो. नंतर या लाकडाचे दोन्ही टोक आरीने कापून त्याला गेरू लावून अगदी कटसाईज लाकडाप्रमाणे त्याची तस्करी केली जाते.परिपक्व वृक्षांची कत्तलपरिपक्व अशी ४५ ते ६०, ६० ते ७५, ७५ ते ९०, ९० ते १०५, १०५ ते १२०, १२० ते १३५ गोलाईची झाडे चोरटे तोडत आहेत. २० ते २५ वर्षे वयाची झाडे यात तोडली गेली आहेत. त्याखालील गोलाईच्या झाडाला चोरटे हातही लावत नाहीत. कोट्यवधीची वृक्षतोड होत असतानाही खैरियत अहवालातील माहिती आणि परिस्थितीदर्शक प्रत्यक्ष क्षेत्रीय स्थिती यात तफावत आहे. यात जंगलाचे वाटोळे आणि पर्यावरणाचे दिवाळे निघाले आहे.