पशुसंवर्धन मंत्र्यांची माहिती : बोड फार्म होणार सुरूपरतवाडा : विदर्भातील शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा करताना तो फायद्याचा ठरावा आणि जगाचा पोशिंदा कर्जबाजारी, नापिकीमुळे आत्महत्येचा मार्ग पत्करू नये, यासाठी शासनद्वारे शेकडो योजना राबविण्यात येतात. त्याचा फायदा घेण्यासोबत मेळघाटातील ‘बोड फार्म’ येथे बंद पडलेल्या केंद्राला पुन्हा सुरू करण्यासोबत येथील शीतकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली. अचलपूर येथे तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या लोकार्पणासाठी आले असता त्यांनी परिसरातील दुग्ध व्यवसायासह इतरही विभागांतर्गत येणाऱ्या कामांची माहिती जाणून घेतली. पुन्हा वाढणार दूधगंगामेळघाटात गवळी बांधव अधिक आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय दूध विक्रीसोबत शेती आहे. त्याचप्रमाणे दुधाचा व्यवसाय आदिवासी शेतकरी करू लागले आहे. एकेकाळी मेळघाटात ५० हजार लीटरपेक्षा अधिक दूध उत्पादक शेतकरी, गवळी बांधवांना दुधाळू गुरांच्या चाऱ्यापासून विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अचलपूरचे आ. बच्चू कडू यांनी अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरासह मेळघाटातील आदिवासी गवळी दूध उत्पादकांना न्याय देण्याची मागणी केली. कोरडवाहू शेतीसह जोडधंदा दुधावर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह मेळघाटात चालतो अशांना मदतीचा हात देण्याची मागणी करीत शासनाने शेणखताला अनुदान द्यावे, ज्यातून नैसर्गिक शेतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि शेतकऱ्यालासुद्धा व्यवसाय मिळणार असल्याची मागणी आ. बच्चू कडू यांनी करीत दूध उत्पादन शेतकऱ्यांच्या व्यथा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यापुढे मांडल्यात, तर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मेळघाटच्या बोडफार्मबद्दल मंत्र्यांसोबत विशेष चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी विविध मुद्यांवर माहिती देत चांगला प्रकल्प पुन्हा राबविण्याचे सांगितले.सेमाडोह, परतवाड्याचे केंद्र भंगारातपशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाकडे असलेल्या शासकीय इमारती शासनाच्या उदासीन धोरणामुळे भग्नावस्थेत पडून आहेत. लाखो रुपयांची यंत्रसामग्रीसुद्धा भंगारात पडल्याचे चित्र आहे. सेमाडोह आणि परतवाडा येथील दूध शीतकरण केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी अचलपूरचे आ. बच्चू कडू यांनी केली. महिला बचत गटाला देऊन रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. त्यावर पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिलेला होकार प्रत्यक्षात कृतीदाखल झाल्यास पुन्हा हजारो लिटर दूध येथे संकलित होणार आहे.सहा महिने हजारो लीटर दूधमेळघाटातील आलाडोह, मोथा, लवादा, वस्तापूर, कुलंगणा, जामली (आर), खोंगडा टेंब्रुसोंडा, तेलखार, उपातखेडा, चुरणी, वैराट पुनर्वसन, मडकी, देवगाव, वडगाव फत्तेपूर, हरिसाल, कोठा, जांबू, सेमाडोह, बोधरा, मालूर लवादा, रोरा आदी मोठ्या प्रमाणात इतरही खेड्यांमध्ये गवळी समाज आहे. त्यासोबतच आदिवासीसुद्धा दुधाचा जोडधंदा करू लागले आहेत. १९७८ पर्यंत ५० हजार लीटरपेक्षा अधिक दूध उत्पादक व्हायला अलीकडे ती संख्या अर्ध्यावर आली आहे. जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांत सर्वाधिक दूध उत्पादित होते, तर एप्रिल, मे, अर्धा जून महिना दुधाच्या थेंबासाठी याच मेळघाटात वणवण भटकते. चाऱ्याचा मोठ्या प्रमाणात अभाव, जंगल चरई बंद, व्याघ्र प्रकल्पाचे कडक नियम आणि त्यावरही शासकीय उदासीनता असल्याचे मत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मांडले. (प्रतिनिधी)बोडफार्म ठरणार ‘फिनिक्स पक्षी’राखेतून पुन्हा उंच भरारी घेण्याचा प्रयोग मेळघाटच्या बोडफार्मबद्दल होणार आहे. १९२७ ते २००४ जवळपास ७७ वर्षे दुधासह पशुपैदास केंद्र व संकरित गायी, म्हशींचे केंद्र असलेले धारणी तालुक्यातील बोडफार्म मागील काही वर्षांत जमीनदोस्त झाले आहे. पडक्या इमारतीचे सांगाडे तेवढे शिल्लक होते. आता तेसुद्धा चोरीला गेल्याने ‘येथे होता बोर्ड फार्म’ असे म्हणत इतिहासजमा झालेली वास्तू पुन्हा उभारण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी जाहीर केले. येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात बोडफार्मचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. राखेत मिसळून पुन्हा भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षीचा प्रयोग बोडफार्मसाठी होणार असल्याचे शुभसंकेत आहे. मेळघाटात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. बोर्डफार्मसह परतवाडा आणि सेमाडोह येथील बंद पडलेले शीतकरण केंद्र शासनाने सुरू करावे, यासाठी पशुसंवर्धन मंत्र्यांना आपण संपूर्ण परिस्थिती कळविली आहे.- बच्चू कडू,आमदार, अचलपूरमेळघाटातील बोर्डफार्म व इतरही आपल्या खात्यामार्फत आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी लवकरच मी दौरा करेन आणि येथील नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करू.- महादेव जानकर,पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्रीमेळघाटातील गावात जाऊन शेतकऱ्यांकडून दूध विकत घ्यावे, ५० वर्षे जुनी दूध फॅट काढण्याची पद्धत बंद करून संगणक पद्धतीचा अवलंब करावा, दुधाच्या दरातील मोठी तफावत दूर करून नवीन दर द्यावा, संकरित गुरांचे वाटप करून बेरोजगारांना रोजगार द्यावा.- जयंत खडके,संचालक, जिल्हा दूध उत्पादक संघ, मेळघाट
मेळघाटात पुन्हा वाहणार दूधगंगा
By admin | Updated: September 7, 2016 00:20 IST