शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

'विदर्भातील महत्त्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 16:03 IST

स्थानिक गौरी इन हॉटेल लॉन येथे आयोजित १९४५ कोटींच्या निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

ठळक मुद्देरस्त्यांचे भक्कम जाळे१९४५ कोटी निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण

अमरावती : विदर्भातील शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री  नितीन गडकरींनी केली आहे.

विदर्भात रस्त्यांचे भक्कम जाळे निर्माण झाले. महत्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्थानिक गौरी इन हॉटेल लॉन येथे आयोजित १९४५ कोटींच्या निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

श्रीक्षेत्र बहिरम येथे एक किलोमीटर दुतर्फा सेवा रस्त्यासाठी ३५ कोटी, मोझरी येथे वळण रस्त्यासाठी ११५ कोटी निधीबरोबरच मोर्शी, वरूड, चांदूर बाजार येथील बायपास मार्गासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा  गडकरी यांनी केली. मेळघाटातील नियोजित रस्ते विकासाचे काम पूर्ण होण्यासाठी व वनविभागाच्या परवानगी आदी प्रलंबित प्रकिया पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. अकोला ते अमरावती रस्त्याचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होईल, असे ते म्हणाले,

यावेळी महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार सुलभा खोडके, आमदार रवि राणा, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार दादाराव केचे, आमदार किरण सरनाईक, आमदार प्रताप अडसड, आमदार रामदास आंबटकर, महापौर चेतन गावंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे जोडणार

पुढील काळात मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे जोडण्याचे नियोजन आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ,रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. आठ डब्यांच्या या मेट्रोत अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील. त्यातील इकॉनॉमी श्रेणी डब्याचे प्रवास दर बस प्रवासाइतके माफक असतील. या प्रकल्पासाठी उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. विदर्भात अनेक रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, मोर्शी, अचलपूर, अकोट, शेगाव अशी अनेक उत्तम रस्त्यांनी शहरे जोडली जाणार आहेत.

सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार

रस्तेविकास करताना ब्रिज कम बंधारा पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे सिंचनासाठी स्थानिक स्तरावर पाणी उपलब्ध होणार आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला या कामाचा फायदा झाला आहे. विदर्भाची सर्वात मोठी समस्या सिंचनाची आहे. त्यामुळे सिंचन वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत.

शेतकरी हा अन्नदाता आहे. तो ऊर्जादाता झाला पाहिजे. अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला चालना मिळावी. इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध आहेत. त्यांचा वापर वाढावा. इथेनॉलचे पंप सुरू व्हावेत. त्यामुळे इंधनाचा एक सशक्त व परवडणारा पर्याय उभा राहील. जिल्ह्यातील संत्रा निर्यातीला चालना मिळण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. येथील कापड व संत्रा निर्यातीसाठी वर्धा येथील ड्राय पोर्ट उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले. यावेळी सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकMetroमेट्रोNitin Gadkariनितीन गडकरी