शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा समितीवर आता खासदार, जिल्हाधिकारी राहतील सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 20:35 IST

अमरावती : जिल्हा परिवहन आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार अमरावती जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे पुनर्गठण करण्याचे शासनाचे गुरुवारी धडकले असून, यापुढे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी ऐवजी खासदार राहणार आहेत.

अमरावती : जिल्हा परिवहन आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार अमरावती जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे पुनर्गठण करण्याचे शासनाचे गुरुवारी धडकले असून, यापुढे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी ऐवजी खासदार राहणार आहेत. खासदारांच्या अध्यक्षतेखाली ही नवी समिती कार्यान्वित करण्यात येणार आहे.देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा रस्ता सुरक्षा समितीवर अध्यक्ष म्हणून खासदारांची निवड होणार आहे. यापूर्वी अध्यक्षपदी जिल्हाधिकारी, सचिवपदी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, इतर अनेक महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी सदस्य होते. रस्त्यावरील वाहतूक नियमनाच्या दृष्टिकोणातून अनेक तक्रारी या समितीकडे प्राप्त होतात. जिल्हाधिकाºयांकडे अनेक समित्यांचे अध्यक्षपद आहे, शिवाय त्यांच्या प्रशासकीय कामांचा व्याप लक्षात घेऊन खासदारांना या समितीचे अध्यक्ष करण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे आदेश नुकतेच धडकले. सचिवपदी प्रादेशिक परिवहन अधिकारी राहतील, तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचाही समिती सदस्य म्हणून समावेश राहणार आहे.असे असतील समितीचे सदस्यजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, महापालिकेचे महापौर, जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील सर्व आमदार समितीचे सदस्य राहणार आहेत. जिल्ह्यातील उपविभागीय न्यायदंडाधिकारी या समितीत असणार आहेत. अध्यक्षांद्वारा तीन अशासकीय प्रतिनीधी समाविष्ट केले जाणार आहेत. विभागातील आॅटोमोबाइल डिलर संघटनेचे प्रतिनिधी, मालवाहतूकदार संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शिक्षणाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, राज्यमार्ग विभागाचे अधिकारी या समितीत असणार आहेत. आरटीओ व एआरटीओ या समितीचे सदस्य सचिव राहतील.रस्ता सुरक्षा समितीचे कामकाजजिल्ह्यातील रस्त्यांच्या सुरक्षेवर लक्ष, रस्ता अपघातांच्या आकडेवारीवर लक्ष, रस्ता अपघातांच्या कारणांची मीमांसा, राष्ट्रीय/राज्य रस्ते सुरक्षा परिषदेला सूचना-तक्रारी नोंदवणे आदी बाबींवर रस्ता सुरक्षा समितीचे कामकाज चालणार आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून यासंदर्भाचे पत्र प्राप्त झाले आहे. लवकरच बैठक घेऊन नवीन समिती गठीत करण्यात येईल.- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAmravatiअमरावती