शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

मेळघाट जलमय; २७ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 11:59 IST

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे.

ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यात संततधार पूल खचले, युवक बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. यात दिया व उतावली दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने धारणी तालुक्यातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. २४ तासांत मेळघाटात तब्बल २३७ मिमी पाऊस झाल्याने मेळघाट जलमय झाला आहे. मेळघाटातील सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पहिल्याच मोठ्या पावसाने मेळघाटातील आदिवासी बांधवांचे जीवनमान प्रभावित झाले आहे.गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील दोन तालुक्यांच्या १२ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना, गडगा, तापी व छोट्या मोठ्या नदीनाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास सिपना नदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे हरिसाल येथील दहा व दुनी येथील काही घरांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाद्वारे तेथील बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांची जि.प. शाळेमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. परतवाडा ते अंजनगाव सुर्जी रस्त्यावर सापन नदीवरील वडगाव फत्तेपूर येथील पूल खचलेला असून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. चिखलदरा तालुक्यातील चुरणी-काटकुंभ मार्गावर दरड कोसळल्याने तो मार्ग काही कालावधीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शहानूर प्र्रकल्पामध्ये मासे पकडण्यास गेलेला तरुण वाहत गेला. घरालगतच्या जि.प. शाळेची भिंत अंगावर कोसळून एक चिमुकली गंभीर जखमी झाली. धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर व मोर्शी तालुक्याला संततधार पावसाचा फटका बसला. ७२ तासांपासून कोसळत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील अप्पर वर्धा, सपन, पूर्णा, शहानूर व चंद्रभागा या पाचही सिंचन प्रकल्पांच्या जलसंचयात मोठी वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार शोध बचाव पथकाचे दोन पथक मेळघाटात पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :Rainपाऊस