शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 07:31 IST

किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला सोमवारी, ३० सप्टेंबरला ३१ वर्षे पूर्ण झाले. यानिमित्त ‘ब्लॅक-डे’ पाळला जात असताना भूकंपाचे हादरे जाणवल्याने किल्लारीच्या आठवणींनी धस्स झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर या तालुक्यांसह काही गावांमध्ये सोमवारी दुपारी भूकंपाचे सौम्य झटके बसले. दोन सेकंदांच्या या भूकंपाच्या झटक्याने नागरिक हादरून गेले. अचानक जमीन हलल्यामुळे दहशत पसरली. यात कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाली नाही, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.

कुठे काय घडले? nपरतवाडा येथील ब्राह्मण सभेत पलंग, डायनिंग टेबल, टीनपत्रे हलले nजमिनीतून सौम्य असा आवाजही आला. लोक त्वरित घराबाहेर पडले. nधारणी, चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, चुर्णी, खटकाली, सेमाडोह, हरिसाल या पट्ट्यातील अनेक घरांना हादरे बसले. nचिखलदऱ्यात घराच्या भिंतीला तडे गेल्याचे प्रभारी तहसीलदारांनी सांगितले. 

किल्लारीच्या आठवणी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला सोमवारी, ३० सप्टेंबरला ३१ वर्षे पूर्ण झाले. यानिमित्त ‘ब्लॅक-डे’ पाळला जात असताना भूकंपाचे हादरे जाणवल्याने किल्लारीच्या आठवणींनी धस्स झाले.

चार गावांना धक्केअकोला : जिल्ह्यातील चार गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामध्ये अकोट तालुक्यातील रुधाडी, खिरकुंड, पिंप्री जैनपूर ही तीन गावे व तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड या गावांचा समावेश आहे. यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंप