शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

माेघे अविरोध, पुरकेंची माघार; हर्षवर्धन देशमुख रिंगणात अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणुकीत २०६ उमेदवार

By गणेश वासनिक | Updated: November 5, 2022 19:23 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सिनेट निवडणुकीत माजी मंत्र्यांचे उमेदवारी अर्ज असल्याने ही निवडणूक रंगणार आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सिनेट निवडणुकीत माजी मंत्र्यांचे उमेदवारी अर्ज असल्याने ही निवडणूक रंगणार आहे. शुक्रवारी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने माजी मंत्री शिवाजीराव मोघे अविरोध झाले आहेत. तर माजी मंत्री तथा श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांची उमेदवारी कायम असल्याने सिनेटची निवडणूक चांगलीच गाजणार आहे.

शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरचा दिवस होता. त्यानुसार सिनेट निवडणुकीत २०६ उमेदवार रिंगणात असणार आहे. २० नोव्हेबर रोजी सकाळी ७ ते ५ या कालावधीत मतदानप्रक्रिया राबविली जाणार आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यात ६३ मतदान केंद्र असणार आहे. आतापर्यंत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर २०६ जण रिंगणात आहे. परंतु, यावेळी माजी मंत्र्यांनी सिनेट सदस्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढणार आहे. शिवाजीराव मोघे हे संस्था चालकांचे प्रतिनिधी म्हणून अनुसूचित जमाती प्रवर्गातून अविरोध आलेत. प्रा. वसंत पुरके यांचाही उमेदवारी अर्ज होता. मात्र, कॉंग्रेसचे दोन तुल्यबळ नेते सिनेटच्या एसटी प्रवर्गातून एका जागेसाठी आमने-सामने उभे ठाकणार होते. मात्र, प्रा. पुरकेंनी माघार घेतली आणि मोघेंच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

असे आहेत प्रवर्गनिहाय २०६ उमेदवार

- प्राचार्य : १९- संस्था चालकांचेे प्रतिनिधी: ११-दहा शिक्षक: ३१- विद्यापीठ शिक्षक:४- नोंदणी पदवीधर : ३५-विद्वत परिषद :१२- परीक्षा मंडळ : ९४

‘शिवाजी’नंतर भैय्यासाहेबांची सिनेटवर नजर

राज्यात दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी संस्था चालकांचे प्रतिनिधीसाठी सिनेट निवडणुकीत अर्ज दाखल केला आहे. खुल्या प्रवर्गातून सिनेट सदस्यासाठी भैय्यासाहेब यांची उमेदवारी असल्याने यंदा सिनेट निवडणूक रंगणार आहे. संस्था चालकांचे चार प्रतिनिधी खुल्या प्रवर्गातून निवडले जातील. हर्षवर्धन देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्थेनंतर आता सिनेटवर नजर रोखली आहे. चार जागांसाठी हर्षवर्धन देशमुख यांच्यासह डॉ. नरेंद्र बोबडे, हरीश बोचरे, डॉ. अशोक चव्हाण,राम देवरसकर, रविशंकर धांडे, ठाकुरदास मालाणी, यदुराज मेटकर, ॲड. मोतीसिंह मोहता, डॉ. भीमराव वाघमारे असे दहा उमेदवारांमध्ये चुरस होणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ