शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नगरसेवकाच्या आत्मदहन इशाऱ्यानंतर सभा गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतरची बोलावलेली ही पहिलीच सर्वसाधारण सभा. विषय पत्रिकेवरील प्रस्तावांसह प्रभागातील समस्येवर चर्चा करण्याकरिता नगरसेवकही सभागृहात पोहचलेत. दरम्यान, भाजप नगरसेवक विवेक सोनपरोते या सभेवर आक्षेप घेतला. सभेची नोटीस सभेच्या सात दिवस आधी मिळाली नाही.

ठळक मुद्देमुद्दा विषयपत्रिका वेळेवर मिळाल्याचा : अचलपूर नगरपालिकेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : भाजपा नगरसेवकाने दिलेल्या आत्मदहनाच्या धमकीमुळे अचलपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षांना तहकूब करावी लागली. शनिवार, ७ डिसेंबरला दुपारी ३ वाजता नगराध्यक्षा सुनीता फिसके यांनी ही सर्वसाधारण सभा बोलावली होती. सभेत १४ प्रस्तावांवर चर्चेअंती निर्णय घ्यायचा होता. या सभेची सूचना नगरसेवकांना दिली गेली.विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतरची बोलावलेली ही पहिलीच सर्वसाधारण सभा. विषय पत्रिकेवरील प्रस्तावांसह प्रभागातील समस्येवर चर्चा करण्याकरिता नगरसेवकही सभागृहात पोहचलेत. दरम्यान, भाजप नगरसेवक विवेक सोनपरोते या सभेवर आक्षेप घेतला. सभेची नोटीस सभेच्या सात दिवस आधी मिळाली नाही. नोटीससोबत टिपणीसुद्धा दिल्या गेली नाही. यामुळे ही सभा स्थगित करण्यात यावी. सभा नव्याने बोलाविल्या जावी. तसे न केल्यास आत्मदहन करेल, असा लिखित इशारा नगरपालिका प्रशासनाकडे त्यांनी सादर केला. नगरसेवक सोनपरोते यांनी दिलेल्या निवेदन वजा इशाºयावर मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी नगराध्यक्षा सुनीता फिसके यांचे समवेत चर्चा केली. चर्चेनंतर त्या सभागृहात दाखल होत सभेस सुरूवात केली. यात नगरसेवक प्रवीण पाटील आणि ल. ज. दीक्षित यांनी नगरसेवक सोनपरोते यांच्या निवेदनाविषयी मुख्याधिकाऱ्यांना माहिती विचारली. सोनपरोते यांनी नोटीस वेळेवर न मिळाल्यामुळे आत्मदहनाचा इशारा दिल्याची माहिती मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी सभागृहाला दिली. मुख्याधिकाºयांच्या निवेदनानंतर नगराध्यक्षांनी कोरमअभावी सभा तहकूब झाल्याची घोषणा केली.पालिका प्रशासनाचे नमतेसभेच्या कोरमकरिता आवश्यक नगरसेवक उपस्थित होते. आत्मदहनाच्या इशाºयामुळे सभा तहकूब केल्यास नगरपालिकेची नाचक्की होणार होती. यात उपलब्ध परिस्थितीत नगराध्यक्षांनी ही सभा कोरमअभावी स्थगित करीत असल्याचे स्पष्ट केले. तहकूब करण्यात आलेली ही सर्वसाधारण सभा विषयपत्रिकेवरील त्याच १४ प्रस्तावांसह सात दिवसांनंतर घेतली जाईल. तशी मागणीही नगरसेवकांनी केली आहे. न. पा. प्रशासनाने त्यास दुजोरा दिला आहे. नगरसेवकाच्या आत्मदहन इशाºयापुढे सर्वसाधारण सभा तहकूब होण्याची अचलपूर पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली आहे. सभेची नोटीस वेळेच्या आत न मिळाल्यामुळे आत्मदहनाचा इशारा देणारे ते पहिलेच नगरसेवक ठरले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका