शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
2
अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
3
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
4
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
5
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
6
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
7
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
8
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
9
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
11
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
12
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
13
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
14
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
15
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
16
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
17
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
18
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
19
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
20
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या आदिवासींच्या समस्यांबाबत सोमवारी बैठक, समाधानकारक निर्णयाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 18:12 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या आठ गावांतील हजारो आदिवासींच्या समस्यांवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक बोलविण्यात आली आहे. पुनर्वसित वस्त्यांमधील गैरसोयींना कंटाळून काही दिवसांपूर्वी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी त्यांच्या मूळगावी परतले होते.

 चिखलदरा (अमरावती), दि. 17  - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या आठ गावांतील हजारो आदिवासींच्या समस्यांवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक बोलविण्यात आली आहे. पुनर्वसित वस्त्यांमधील गैरसोयींना कंटाळून काही दिवसांपूर्वी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी त्यांच्या मूळगावी परतले होते. त्यामुळे प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली होती. 

चिखलदरा तालुक्यातील सोमठाणा खुर्द, सोमठणा बु., केलपाणी, अमोना, नागरतास, गुल्लरघाट, धारगड व बारूखेडा या आठ गावांचे व्याघ्र प्रकल्पांच्या गाभाक्षेत्रातून सन २०११ ते २०१५ या वर्षात टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले. मात्र, मेळघाटप्रमाणे त्यांना कुठल्याच मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत.  यामुळे आदिवासींमध्ये प्रचंड संताप उफाळून आला. अखेरीस १६ आॅगस्ट रोजी माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात बैठक घेऊन ९ सप्टेंबर रोजी सर्व आदिवासी मूळगावी परतीचा निर्णय घेतला होता. व्याघ्र प्रकल्पासह महसूल विभागाने याआंदोलनाचा धसका घेतला होता. आदिवासींना रोखण्यासाठी प्रचंड पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता. मात्र, तरीही आदिवासींनी खटकाली नाक्याचे कुलूप तोडून मुळगावी प्रवेश केला होता. या प्रकारामुळे शासनाला खडबडून जाग आली. अकोला व अमरावतीच्या जिल्हाधिकाºयांनी १० सप्टेंबर रोजी दिवसभर आदिवासींची मनधरणी केली. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनी राजकुमार पटेल यांचे मन वळवून समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत आदिवासींना पुनर्वसित गावी परत नेले होते. 

आज मुख्यमंत्री घेणार आढावापुनर्वसित आदिवासींच्या सर्व समस्यांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी मुंबईत ऐकणार आहेत. या बैठकीला अमरावतीचे आ.सुनील देशमुख, माजी आमदार राजकुमार पटेल, पाणीपुरवठा, महसूल, ग्रामविकास, वने, आदिवासी विभागाचे सचिव, अकोला व अमरावतीचे जिल्हाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

दोन्ही आमदार बेपत्ता?मेळघाटचे आ. प्रभूदास भिलावेकर व अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आलेले नाही, हे पत्रावरून स्पष्ट झाले आहे. पुनर्वसित गावात आ.भिलावेकर पोहोचताच आदिवासींनी प्रश्नांचा भडीमार केला होता. त्यानंतर ते इकडे फिरकलेच नाहीत, असे आदिवासींचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार