शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची यांत्रिक मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:21 IST

डिझेलचे दर वाढले, गावोगावी ट्रॅक्टरच्या संख्येत भर, अवजारांची बँक आवश्यक कावली वसाड : प्रीमियम पेट्रोल शंभरीच्या पुढे आणि साधे ...

डिझेलचे दर वाढले, गावोगावी ट्रॅक्टरच्या संख्येत भर, अवजारांची बँक आवश्यक

कावली वसाड : प्रीमियम पेट्रोल शंभरीच्या पुढे आणि साधे पेट्रोलही शंभरीकडे गेल्याने दुचाकी, चारचाकी वाहने चालवावी कशी, अशी ओरड होत आहे. त्याचवेळी डिझेलचेही दर वाढले आहेत. त्यामुळे शेतीची ट्रॅक्टरने मशागत शेतक०यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्याचवेळी ट्रॅक्टरमालकही कधी नव्हे तो मशागतीच्या संपूर्ण पैशांच्या ॲडव्हान्ससाठी अडून बसल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.

गतवर्षापेक्षा यावर्षी धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, सोयाबीन व तूरदेखील वेळेच्या अगोदर निघाल्याने शेते पूर्णतः रिकामी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या मागे लागला असला तरी डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने मशागत करणे आवाक्‍याबाहेर झाले असल्याची शेतक०यांची व्यथा आहे.

एकीकडे डिझेलसह सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. यामुळे उत्पन्नामध्ये अधिकाधिक वाढ व्हावी, यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत आहे. यामुळे शेती करावी तरी कशी, असा पेच शेतक०यांपुढे आहे.

----------

-----

बैलजोड्यांची संख्या घटली

अलीकडे एकत्र कुटुंबपद्धती लयाला गेली आणि सोबतच बैलजोड्यांची संख्या कमी झाल्यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीची मशागत ट्रॅक्‍टरच्या साह्याने करू लागला. त्यामुळे ट्रॅक्‍टरच्या संख्येत वाढ झाली. प्रत्येक गावात दहा ट्रॅक्टरच्या वर अधिक संख्या झाली आहे. प्रत्येक शेतकरी नांगरणी, वखरणीच नव्हे, पेरणी व पिकांना फवारणीसुद्धा ट्रॅक्‍टरच्या साह्याने करीत आहेत.

--

डिझेलचा दर - ८६.५४ रुपये

गतवर्षी नांगरणी - ५०० रुपये प्रतिएकर

यंदा नांगरणी - ७०० रुपये प्रतितास

-------------

रासायनिक खताचा वापर होत असल्याने शेतजमिनीचा पोत बिघडला आहे. परिणामी जमिनीचा कडकपणा वाढला. त्यामुळे बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरने नांगरणी वखरणी केली, तर फायद्याचे ठरते. यंदा त्याचा दरही वाढला आहे.

- राजू झलके, जळगाव आर्वी

-----------

डिझेलचा दर गतवर्षी प्रतिलिटर ६७ रुपयांच्या आसपास होता. तो आता ८६ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे प्रतिएकराचा मोबदला आता प्रतिलिटरवर गेला आहे. शेतक०यांनी ८० टक्के मोबदला दिला, तर काही तरी शिल्लक पडेल.

- महेंद्र इंगळे, कावली वसाड

------------

एकल शेती करण्याऐवजी अवजारांची बँक गावोगावच्या शेतक०यांनी एकत्र येऊन स्थापन केल्यास शेतीच्या खर्चाचा भार वहन करणे सोपे जाईल. हा विचार बोलून दाखवण्याऐवजी लवकरात लवकर कृतीत आणावा लागेल.

- सूरज शिसोदे, नायगाव