शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेनगर हद्दीत एमडीची विक्री, दोन ड्रग्स पेडलरला अटक

By प्रदीप भाकरे | Updated: June 20, 2025 17:04 IST

३१.५८० ग्रॅम एमडी जप्त : पोलिस आयुक्तांच्या सीआययू पथकाची दमदार कारवाई

अमरावती : गाडगेनगर हद्दीत एमडीची खुलेआम विक्री करणाऱ्या दोन ड्रग्स पेडलरला अटक करण्यात पोलिस आयुक्तांच्या ‘सीआययू’ विशेष पथकाला यश मिळाले. एमडी ड्रग्ज विक्रीसाठी जात असलेल्या दोघांना सीआययू पथकाने १९ जून रोजी रात्री वलगाव मार्गावरून अटक केली. त्यांच्याकडून ३१.५८० ग्रॅम एमडी ड्रग्जसह दोन दुचाकी, मोबाइल व रोख असा ४ लाख २६ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेख अयान शेख रमजान (१९) रा. हबीबनगर, अमरावती व सय्यद आफाक सय्यद निझाम (२०) रा. ताजनगर क्र. १, अमरावती अशी अटक आरोपींची नावे आहेत.

             एफआयआरनुसार, शेख अयान व सय्यद आफाक हे दोघे एमडी ड्रग्जचे पाऊच बाळगून विक्री करण्याकरिता दुचाकीने वलगाव मार्गावरील धर्मकाट्याकडून नागपुरी गेटकडे येणार असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या सीआययू पथकाला मिळाली. त्या आधारे पथकाने वलगाव मार्गावर सापळा रचून शेख अयान व सय्यद आफाक यांना ताब्यात घेतले. अंगझडती तसेच दोन्ही दुचाकींच्या डिक्कीची पाहणी केल्यावर त्यांच्याजवळ २ लाख २२ हजार रुपये किमतीची ३१.५८० ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आली. त्यानुसार पथकाने या दोघांना अटक करून त्यांच्याकडून एमडी ड्रग्ज, दोन दुचाकी, दोन मोबाइल व १४ हजार २६० रुपये रोख असा एकूण ४ २६ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सीआययू युनिटचे प्रमुख तथा सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, अंमलदार सुनील लासूरकर, सुधीर गुडधे, जहीर शेख, अतुल संभे, राहुल ढेंगेकर, विनोद काटकर यांनी केली.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ