शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:01 IST

महापालिका प्रशासनत अलीकडे घोटाळ्यांची मालिकाच सुरू झाली आहे. स्मार्ट सिटीच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. यात नागरिकांचा स्वप्नभंग झाला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सार्वजनिक व वैयंक्तिक शौचालय बांधकामाचा सर्वात मोठा घोटाळा समोर आलेला आहे. ५० लाखांची रेस्क्यू व्हॅन २.५ कोटींना खरेदी करण्यात आलेली आहे. सायबर टेक घोटाळाप्रकरणी एफआयआरबाबत प्रशासन गप्प बसले आहे.

ठळक मुद्देयुवक काँग्रेस आक्रमक : घोटाळ्यांचे सत्र, आयुक्तांना निवेदन, प्रचंड घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन वर्षांत महापालिकेत केवळ घोटाळ्यांचे सत्र सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात स्वच्छतेची वाट लागली आहे. या सर्व प्रकारांत महापालिका प्रशासन गप्प बसले आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी गुरुवारी युवक काँग्रेसने केली. प्रचंड घोषणाबाजी करीत विविध मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले.महापालिका प्रशासनत अलीकडे घोटाळ्यांची मालिकाच सुरू झाली आहे. स्मार्ट सिटीच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. यात नागरिकांचा स्वप्नभंग झाला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सार्वजनिक व वैयंक्तिक शौचालय बांधकामाचा सर्वात मोठा घोटाळा समोर आलेला आहे. ५० लाखांची रेस्क्यू व्हॅन २.५ कोटींना खरेदी करण्यात आलेली आहे. सायबर टेक घोटाळाप्रकरणी एफआयआरबाबत प्रशासन गप्प बसले आहे. सध्या कोरोना विषाणूच्या नावावर कोट्यवधी रुपयांच्या निधीची अफरातफर होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या सर्व प्रकारांत महापालिाकेची प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी युवक काँग्रसचे शहराध्यक्ष नीलेश गुहे, एनएसयूआयचे अध्यक्ष संकेत कुलट, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष देवयानी कुर्वे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर तथा नगरसेवक विलास इंगोले, नगरसेवक प्रदीप हिवसे, सलीम बेग युसूफ बेग आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcongressकाँग्रेस