पतीला फसविण्याचा डाव फसला : तरुणीसह प्रियकराविरुद्ध गुन्हे दाखलअमरावती : विवाहित प्रियकराशी छुप्या मार्गाने प्रेमसंबंध ठेवून तरुणीने दुसऱ्या तरुणाशी विवाह केला आणि पतीला फसविण्याचा डाव रचला. मात्र, तिचा डाव अधिक काळ टिकू शकला नाही. तरुणीच्या अशा कृत्याचा नुकताच भंडाफोड झाला असून राजापेठ पोलिसांनी त्या तरुणीसह तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हिन्दू रितीनुसार नागपूर शहरातील सौम्या (काल्पनिक नाव) या तरुणीने ३ मार्च २०१६ रोजी अमरावतीच्या अनमोल (नाव बदललेले) या तरुणाशी विवाह केला. तरुणाने आपल्या पत्नीकडून सुखी संसाराची अपेक्षा केली. त्याने तिला हनीमुनसाठी दुरदूरपर्यंत नेले. तिला हवे ते देण्यास तो तयारसुद्धा होता. मात्र, लग्नानंतरच पत्नीच्या चेहऱ्यावर हिरमुसलेपणा पाहून तो चिंतेत पडला. पत्नीच्या मनात काय आहे, हे त्याला कळेना, सत्य जाणून घेण्यासाठी तो आतूर होता. तिच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता का हिरावली, हे तो शोधत होता. लग्न होऊन आलेली मुलगी आपल्या आई-वडिलांपासून दुरावली तर नाही ना, असेही त्याला वाटत होते. मात्र, २९ मे २०१६ नंतरचे दिवस त्या तरुणाच्या जीवनात अंध:कार करणारे ठरले. या दिवशी तरुणीचे आई-वडील व काका हे सौम्याला घेण्यासाठी अनमोलच्या घरी आले आणि त्यांनी सौम्याला सोबत नेले. प्रियकरासोबत रचला डावअमरावती : दीड महिना ओलांडला, मात्र, पत्नी सौम्या अजूनही सासरी परतली नाही. त्याने थेट सौम्याचे नागपूर येथील घर गाठले. त्यावेळी पत्नीने अनमोलला एकांकात नेऊन तिचे प्रेमप्रकरण कथन केले. सौम्याने नागपुरातील विवाहित विनीत अशोक पोहरे (रा.पुलगाव) या तरुणावर प्रेम असल्याचे सांगितल्यानंतर अनमोलला धक्का बसला. मात्र, त्याने पुढचा विचार करून तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. झाले गेले, विसरून जा, असे म्हणत तो तिला स्वीकारायला तयार झाला. मात्र, सौम्या ही विनीत पोहरेच्या प्रेमात आंधळी झाली होती. सौम्याचे हे प्रेमप्रकरण तिच्या कुटुंबीयांनासुध्दा माहिती होते. मात्र, त्याचे तिला सहकार्य होते. दरम्यान सौम्याने अनमोलला एकतर्फी घटस्फोटाची मागणी केली. जर तू घटस्फोट देत नसेल, तर मी तुझ्याविरुद्ध पोलीस तक्रार करेल किंवा माझ्या जीवाचे काही बरेवाईट करेल, अशी धमकीसुद्धा दिली. एवढेच नव्हे, तर काही दिवसांत सौम्याने अनमोल व त्याच्या कुटुंबीयाविरुद्ध शारीरिक व मानसिक छळाची तक्रार नागपूरमध्ये नोंदविली. हे प्रकरण राजापेठ पोलिसांकडे आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विकास अडागळे यांनी चौकशी सुरू केली. दरम्यान पत्नी सौम्यांविरुद्धचे पुरावे अनमोलच्या हाती लागले. प्रियकारासोबतचे तिचे विविध क्षणांची छायाचित्रे अनमोलने पोलिसांना दाखविले. त्यावेळी सौम्याने रचलेला डाव पोलिसांसमोर उघड झाला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता सौम्या व विनीत पोहरे यांनी संगनमत करून हा डाव रचल्याचे निदर्शनास आले. ही बाब उघड झाल्यावर अनमोलने सौम्या व विनीत पोहरेविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकरणात पोलिसांनी सौम्या व विनीतविरुद्ध भादंविच्या कलम ४९७, ४९४, ४१७ अन्वये गुन्हे नोंदविले. आता हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सोशल मीडियामुळे पर्दाफाश अनमोलशी लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी सौम्या ही तासनतास विनीत पोहरेशी बोलत होती. तीच्या खोलीत जाण्यापूर्वी अनमोलला दारावर नॉक करून आत येण्याची परवानगी घ्यावी लागत होती. सौम्या व विनीतचे व्हॉटसअॅपवर संदेशातून संवाद चालत होता. ही बाब सौम्याच्या मोबाईलवरून अनमोलच्या निदर्शनास आले होते. ती माहेरी जाण्यापूर्वी मोबाईल सासरी विसरून गेली होती. तोच पुरावे सौम्याविरुध्द गुन्हा दाखल होण्यास प्रभावी ठरला. असे विणले जाळेसौम्याची मावशीची नागपूरात खानावळ असून त्या ठिकाणी विनीत हा जेवणाकरिता येत होते. दरम्यान सौम्या व विनीतची ओळख झाली. ओळखीचे स्वरुप प्रेमात बदलले. मात्र, दोघेंही विविध जातीचे असल्यामुळे त्यांच्या कुटुबीयांचा लग्नास विरोध होता. त्यामुळे कुटुबीयांचे समाधान म्हणून सौम्या व विनीतने जातीतच लग्न केले. मात्र, लग्नानंतरही प्रेमप्रकरण सुरु ठेऊन वेगळाच डाव रचला. मात्र, त्यांचा तो डाव अधीक काळ टिकू शकला नाही.
विवाहबाह्य प्रेमसंबंध तरुणीच्या अंगलट
By admin | Updated: January 22, 2017 00:04 IST