शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
2
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
3
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
5
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
6
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
7
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
8
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
9
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
10
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
11
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
12
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
13
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
14
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
15
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
16
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
17
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
18
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
19
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम

नागपूरच्या विवाहितेवर अमरावतीत डांबून लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST

अमरावती : फेसबुकवर मैत्री झालेल्या एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करण्यात आले. तिच्यावर नागपुरातील सीताबर्डी परिसरातील नवनीत ...

अमरावती : फेसबुकवर मैत्री झालेल्या एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करण्यात आले. तिच्यावर नागपुरातील सीताबर्डी परिसरातील नवनीत लॉजवर अत्याचार करून व्हिडीओ तयार करण्यात आला. त्यानंतर तिला अमरावतीत बोलावून महेंद्र कॉलनीतील एका खोलीत १० दिवस डांबून सतत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

पोलीससुत्रानुसार, नितीन श्रीधर थोरात (३० रा. येसुर्णा, ता अचलपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मानेवाडा, नागपूर येथील रहिवासी ३२ वर्षीय महिलेने तक्रार नोंदविली. सदर महिला विवाहित असून आरोपीने तिला ८ ते ९ महिन्यांपूर्वी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर दोघांचेही फोनवर बोलणे व मॅसेज करणे सुरू झाले. दरम्यान आरोपीने महिलेला नागपूरला भेटायला येऊ का, असे विचारले असता, महिलेने त्याला होकार दिला. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बर्डी येथील लॉजवर आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लॉजची सर्व व्यवस्था आरोपीने केली होती. आरोपी व महिलेने रात्रभर लॉजमध्ये मुक्काम केला. त्यानंतर दोघांचेही फोनवर बोलणे सुरू होते. मात्र, एक महिन्यापूर्वी आरोपीने पीडितेला फोन केला व अमरावतीला राहायला ये, आपण दोघे लग्न करू, असे म्हटले. पण ती विवाहित असल्याने त्याला लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, त्याने बर्डी येथील लॉजवर नकळत अश्लील व्हिडीओ तयार केला होता. माझ्याशी तू लग्न केले नाही तर व्हिडीओ यू-ट्युबवर व्हायरल करण्याची धमकी त्याने महिलेला दिली. तोे व्हिडीओ महिलेच्या मोबाईलवरसुद्धा पाठविला. भीतीपोट तो तिने डिलीट केला. मात्र, घाबरलेल्या माहिलेने ही बाब पतीला सांगितली व ४ फेब्रवारी रोजी पतीसोबत अजनी ठाण्यात याची तक्रार नोंदविली. तरीही आरोपीचे महिलेला कॉल सुरूच होते. व्हिडीओ व्हायरलची धमकी येतच होती. तिच्या मुलाला मारण्याचीसुद्धा धमकी त्याने दिली. त्याला कंटाळून अखेर ३० मार्च २०२१ रोजी सदर महिला एसटी बसने नागपूरवरून- अमरावतीला पोहचली. त्यानंतर आरोपी नितीन व त्याचा मित्र तिला घेण्याकरिता बसस्टँवर आले. तेथून महिलेला दुचाकीवर बसवून महेंद्र कॉलनीतील त्याने केलेल्या भाड्याच्या खोलीत नेले. तेथे १० दिवस त्याने महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला जिवे मारण्याची सतत धमकी देत होता. तिला खोलीत डांबून ठेवले. तिच्या मोबाईलमधील सीमसुद्धा काढले. त्यामुळे तिचा कुणाशीही संपर्क होऊ शकत नव्हता. त्याने महिलेजवळून एक चिठ्ठी लिहून घेतली. तिचा मोबाईल विकून टाकला. महिलेचा शारीरिक छळ केला. मात्र, महिलेने संधी साधून ८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता महेंद्र कॉलनीतील आरोपीच्या घरमालकाच्या मोबाईलवरून नागपूर येथील राहत्या घरी भाडेकरू असलेल्या सुमन नावाच्या महिलेशी संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला. ही माहिती सुमनने महिलेच्या पतीला दिली. महिलेचे पती सासू व भासरे अमरावतीतील महेंद्र कॉलनीत पोहचले. येथील घरमालकाच्या मुलाने गाडगेनगर पोलिसांना पाचारण केले. डांबून ठेवलेल्या महिलेची सुटका झाली. सदर गुन्ह्याचे पूर्वीचे घटनास्थळ नागपूर येथील बर्डी ठाणे असल्याने आरोपीला अटक करून सदर तपास नागपुरात वर्ग करण्यात आल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३६६, ३७६ (२)(एन),३४३,५०६(ब)नुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास एसीपी एसएस धुमाळ यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले व पीएसआय राजेंद्र लेवटकर करीत आहे.