शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी उजाडणार मार्च-एप्रिल, शेतक-यांची दिवाळी गोड नाहीच, मंत्र्यांच्या दाव्यांना किशोर तिवारींचा सुरुंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 17:53 IST

दस-यानंतर कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होईल, शेतकºयांची दिवाळी गोड होईल, असा दावा राज्यातील सत्ताधारी मंत्री, आमदार करीत आहेत. परंतु, सरकारचाच एक घटक असलेल्या शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मात्र मंत्र्यांच्या या दाव्यांना सुरूंग लावला आहे.

- राजेश निस्ताने यवतमाळ - दस-यानंतर कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होईल, शेतकºयांची दिवाळी गोड होईल, असा दावा राज्यातील सत्ताधारी मंत्री, आमदार करीत आहेत. परंतु, सरकारचाच एक घटक असलेल्या शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मात्र मंत्र्यांच्या या दाव्यांना सुरूंग लावला आहे. प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी किमान मार्च-एप्रिल उजाडणार असून यंदाची शेतक-यांची दिवाळी गोड नाहीच, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. राज्यभरातील शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. या माफीची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा होण्याबाबतचे वेगवेगळे मुहूर्त सत्ताधा-यांकडून सतत जाहीर केले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात ही माफी लांबणीवर पडत आहे. माफीसाठी लागणा-या निधीची जुळवाजुळव करण्यासाठी तपासणी, आॅडिटच्या नावाखाली सरकारचा टाईमपास सुरू असल्याची विरोधकांची ओरड आहे. त्यांची ही ओरड आता खरी वाटू लागली आहे. कारण राज्यमंत्र्यांच्या दर्जाचे पद सांभाळणा-या शेतकरी नेत्यानेच त्याला अधिकृत दुजोरा दिला आहे. गुरुवारी येथील शासकीय विश्रामभवनावर ‘माध्यमा’ला दिलेल्या मुलाखतीत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कर्जमाफीची सद्यस्थिती कथन केली. तिवारी म्हणाले, कर्जमाफीबाबत इतर राजकीय नेते काय बोलतात हे आपल्यासाठी महत्वाचे नाही. कर्जमाफीचे वास्तव वेगळेच आहे. बँकांना बुडित कर्ज मिळावे, बँकांचे संवर्धन व्हावे यासाठी कर्जमाफी दिली जाते. यापूर्वी ही बाब सिद्ध झाली आहे. यावेळीही त्या पेक्षा वेगळे काही होईल, असे वाटत नाही. दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे शेतकºयांची दिवाळी गोड होणार नाहीच, तशीही साखर महागली आहेच.  सरकार बँकांशी करार करणारकर्जमाफीचा पैसा जमा केला तरी बँका शेतकºयांना नव्याने पीक कर्ज सहजासहजी देणार नाहीत. म्हणून बँकांच्या खात्यात माफीची रक्कम टाकताना व शेतकºयांचे थकीत कर्ज निल करतानाच बँकांशी सरकारकडून करार केला जाईल. नवीन पीक कर्ज शेतकºयांना देऊ याची हमी घेतली जाईल. पीक कर्जाची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा होण्यासाठी किमान मार्च-एप्रिल महिना उजाडणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले. झटपट माफीचे दुष्परिणाम अधिक तिवारी म्हणाले, युती सरकारने कर्जमाफी संबंधी जी घोषणा केली, त्याची निश्चित संपूर्ण अंमलबजावणी होईल. मात्र त्यासाठी वेळ लागणार आहे. कर्जमाफी देण्यासाठी वेळ लागत नसेल आणि सरकार झटपट काही करत असेल तर त्याचे दुष्परिणामही भविष्यात भोगावे लागणार आहे.  अजूनही २००८ ची कर्जमाफी नाही यापूर्वी अशा झटपट कर्जमाफीचा अनुभव २००८ मध्ये दिसून आला. आजही विदर्भातील अनेक शेतक-यांना त्यातील कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीला लबाडाचे आमंत्रण संबोधणा-या नेत्यांनी या सरकारला शहाणपन शिकविण्याची गरज नाही. कारण लबाडाचे आमंत्रण कोण देते आणि लबाडी नेमकी कुणी केली, हे जनतेला चांगले ठाऊक असल्याचेही किशोर तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार