शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

शिर राहिले झाडाला, धड कोसळले जमिनीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 18:24 IST

१९ नोव्हेंबर रोजी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह मंगलधाम कॉलनीनजिकच्या गोवर्धन पर्वतावरील गौरक्षणाजवळच्या जंगलात सापडला. त्याचे शिर झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत, तर धड त्याच ठिकाणी कुजलेल्या स्थितीत जमिनीवर आढळले.

ठळक मुद्देगळफास : मृतदेह कुजला, ओळख पटली, जंगलात पोलिसांची परिक्षा

अमरावती : १९ नोव्हेंबर रोजी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला असून त्याचे शिर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या स्थितीत दिसून आले. ६ डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघड झाली. विशाल गजभिये (३५, रा, कैलासनगर, महादेवखोरी) अशी मृताची ओळख पटविण्यात आली आहे.

मंगलधाम कॉलनीनजिकच्या गोवर्धन पर्वतावरील गौरक्षणाजवळच्या जंगलात त्याचे शिर झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत, तर धड त्याच ठिकाणी कुजलेल्या स्थितीत जमिनीवर आढळले. त्यावरून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

फ्रेजरपुरा पोलीस सूत्रानुसार, मंगलधाम कॉलनीजवळून पुढे जंगलातून कुजलेला वास येत असल्याची तक्रार अज्ञाताने ११२ क्रमांकावर नोंदविली होती. त्यानुसार फ्रेजरपुराचे ठाणेदार राहुलकुमार आठवले हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. १९ नोव्हेंबर रोजी मिसिंग म्हणून नोंदविलेल्या तक्रारीतील छायाचित्र व वर्णन जुळविण्यात आले. मृताच्या कुटुंबीयांनीदेखील तेथे बोलावण्यात आले. त्यानंतर विशाल गजभिये अशी मृताची ओळख पटविण्यात आली. विशाल हा १९ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविण्यात आली होती.

कर्जाच्या तगाद्याने आत्मघात?

मृताच्या पत्नीच्या तक्रारीनुसार, विशाल हा बडनेरा रोड स्थित एका चारचाकी वाहन विक्री प्रतिष्ठाणात कर्मचारी होता. अलीकडे त्याच्यावर बरेच कर्ज झाले होते. अनेकजण त्याच्या घरी पैसे मागायला यायचे. त्यातून त्याला दारूची सवय लागली. त्यातूनच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

विशालची पत्नी भातकुली येथे परिचारिका असल्याचे सांगण्यात आले. जेथे विशालचा मृतदेह आढळून आला तो भाग घनदाट जंगलाचा असून, त्याच्या घराजवळ असल्याचेदेखील सांगण्यात आले. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू