शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील नांदगावच्या मंजिरीने पोलंडमध्ये पटकावले कांस्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 10:46 IST

Amravati News पोलंड येथील युवा जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची खेळाडू मंजिरी मनोज अलोने हिला वैयक्तिक ब्राँझ पदकाने सन्मानित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : पोलंड येथील युवा जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची खेळाडू मंजिरी मनोज अलोने हिला वैयक्तिक ब्राँझ पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच तिचा भारतीय संघातही समावेश होता. भारतीय संघानेही येथील स्पर्धेत लढत देऊन ब्राँझ पदक पटकाविले आहे. (Poland world  youth  archery)

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी येथील खेळाडूने ब्रांझ पदक पटकाविताच सातासमुद्रापार पोलंड देशात भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजली. अन् क्षणभर सारेच मंत्रमुग्ध होऊन भारावले. काल हे वृत्त नांदगावात कळताच क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह संचारला होता. मंजिरी अलोने ही येथील एकलव्य गुरुकुल स्कूलमधील इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी आहे. येथील प्रशिक्षक अमर जाधव यांनी तिचा येथील मैदानावर नियमित सराव करवून घेतला.

तिच्या या कामगिरीबद्दल राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदुरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त सदानंद जाधव, उत्तमराव मुरादे, विलास मारोटकर, विशाल ढवळे, अनूप काकडे, उमेश परसनकर, पवन जाधव, क्रीडा अकादमीचे पदाधिकारी व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले.

टॅग्स :Socialसामाजिक