शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळ साप तस्करांवर करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 17:31 IST

धनप्राप्ती होत असल्याच्या अफलातून कारणांनी वापरला जाणारा मांडूळ (दुतोंड्या) साप तस्करांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना वनविभागाच्या वरिष्ठांनी दिल्या आहेत.

गणेश वासनिक

अमरावती - धनप्राप्ती होत असल्याच्या अफलातून कारणांनी वापरला जाणारा मांडूळ (दुतोंड्या) साप तस्करांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना वनविभागाच्या वरिष्ठांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्पमित्रांवर लक्ष ठेवण्याचे कळविले आहे. त्याअनुषंगाने वन विभाग ‘अलर्ट’ झाला असून, मांडूळ सापाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असल्याचे सर्वश्रूत आहे.

राज्याच्या वन्यजीव विभागाला मिळालेल्या गुप्तचर माहितीनुसार, मांडूळ सापाची तस्करी वाढली आहे. या तस्करीत अप्रत्यक्षरीत्या सर्पमित्रांचा सहभाग असल्याचे बोलले जाते.  त्यामुळे वनविभागाला जंगलासह सर्पमित्रांच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. गतवर्षी अकोट येथे मांडूळाची तस्करी करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. २६ ऑक्टोबर २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळची येथील दीपक रामचंद्र साळुंखे (३२) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून चार फूट लांब व दोन किलो वजनाचा मांडूळ साप जप्त करण्यात आला. तो साप १२ लाख रुपयांत विक्री केला जाणार होता, असे वनविभागाने नोंदविलेल्या बयाणातून स्पष्ट झाले. त्यानंतर यादोघांवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन वनविभागाने सोडले. पिसुळी येथील एका शेतातून दुर्मिळ मांडूळ साप पकडून त्याची इतरत्र तस्करी केली जात होती, असे पोलिसांच्या तपासाअंती पुढे आले. त्यामुळे वनविभागाने या सापाच्या तस्करीप्रकरणी राज्यात वन विभागाला ‘अलर्ट’ राहण्याबाबतचे सूचना दिल्या आहेत.

सापांचे ‘मॉनिटरींग’ नाही

वनविभागात सापाचे ‘मॉनिटरिंग’ नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ सर्पमित्रांचे सोशल मीडियावर ग्रूप आहे. सर्पमित्राने कोणत्या प्रजातीचा साप पकडला आणि जंगलात सोडला, हे व्हॉट्अपवर कळते. मात्र, यासंदर्भात वन विभागाकडे अधिकृतपणे नोंदी राहत नाही. एकूणच सापांचे ‘मॉनिटरिंग’ पासून वनविभाग अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच मांडूळ सापाची तस्करी वाढल्याचे वास्तव आहे.

गुप्तधन शोधण्यासाठी केला जातो वापर

मांडूळ साप हा गुप्तधन शोधण्यासाठी वापरला जात असल्याची माहिती मिळाली आहे. वनविभागाचा नोंदी हा प्रकार अंधश्रद्धेचा असला तरी अनेक वर्षांपासून दुतोंड्या सापाची मागणी वाढतच आहे. ज्या भागात गुप्तधन असते, त्या परिसरात हा साप सोडल्यास तो त्याच भागात शिरतो आणि गुप्तधनाचे स्थळ निश्चित करतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  मांडूळ साप हा दुर्मिळ आहे. तो विदर्भात फार कमी आढळून येतो. वरिष्ठांकडून दक्ष राहण्याच्या सूचना मिळाल्या असून, काहींवर गोपनीयरीत्या पाळत ठेवली जात आहे.

- अशोक कविटकर, सहायक वनसंरक्षक, वन विभाग, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावतीsnakeसाप