शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

वर्गातील मुलामुलींना बाहेर काढून म्हणाला, माझ्याशी लग्न कर; धामणगाव तालुक्यातील प्रकार

By प्रदीप भाकरे | Updated: January 27, 2023 15:00 IST

पिडिता अवघ्या १४ वर्षांची

अमरावती : शाळेतील एका वर्गखोलीत शिरून व तेथील विदयाथ्यांना बाहेर काढून एका अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढण्यात आली. माझ्याशी लग्न कर असे दरडावत त्या शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी २६ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पिडिताच्या आईच्या तक्रार नोंदविली. त्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी चेतन संजय निवल (२६, रा. जळका पटाचे, ता. धामणगाव) याच्याविरूद्ध विनयभंग, धमकी, पोक्सो व ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. २६ जानेवारी रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास १३ वर्ष ९ महिने वयाची विदयार्थिनी शाळेतून घरी परत येत असताना आरोपी चेतन निवल हा दुचाकीने मागून आला. रस्ता अडवुन तुझे फोटो काढून मला पाठव, नाही पाठविले तर घरी येऊन मारेन, अशी धमकी तिला दिली. तत्पुर्वी, १५ दिवसांआधी आरोपी हा पिडीताच्या शाळेत जाऊन तिच्या वर्गात शिरला होता. वर्गातील मुला मुलींना बाहेर काढले. आपल्या सोबत लग्न कर असे तो दरडावणीच्या सुरात म्हणाला. पिडीताने त्यास नकार दिला असता, तो तेथून निघून गेला. २६ जानेवारी रोजी देखील त्याने छेडखानी केल्याने ती बाब तिने आईला सांगितली. तिच्या आईने तिला घेऊन गुरूवारी पोलीस ठाणे गाठले.

अन् तिने चालत्या दुचाकीवरन टाकली उडी

ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीच्या छेडखानीच्या घटना अधिकच वाढल्या आहेत. खोलापूर पोलीस ठाण्याच्या हददीत राहणारी १६ वर्षे ९ महिने वयाची मुलगी बसस्टॅंडवरून पायदळ घरी जात असताना आरोपी सागर अंबाडकर (३०, रा. कसबा खोलापूर) याने तिचा पाठलाग केला. तिच्याशी खाेटे बोलून तिला दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यादरम्यान त्याने तिच्याशी अश्लिल कथन केले. तिचा विनयभंग केला. त्यामुळे तिने घाबरून चालत्या दुचाकीवरून खाली उडी घेतली. त्यामुळे ती जखमी झाली. २६ जानेवारी रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. खोलापूर पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी सागर अंबाडकर विरूद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती