शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

धक्कादायक! पित्याच्या मृत्यूनंतर साडीचोळीच्या बहाण्याने सर्वस्व लूटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 14:57 IST

पीडिता ही तिच्या वडिलांच्या मयतीकरिता नाशिक येथे गेली. त्यावेळी सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर नितीन हा तिला साडीचोळी करण्याकरिता नाशिक येथील घरी घेऊन गेला. व रात्रीच्या वेळेस अचानक तिच्या खोलीत शिरून तिच्याशी बळजबरी केली.

ठळक मुद्देआरोपी नाशिकचागळा आवळला, विष पाजण्याचीही धमकी नात्याला काळिमा

अमरावती : विष देऊन जीवानिशी मारण्याची धमकी देऊन एका महिलेचे सर्वस्व लूटण्यात आले. नाशिक पाठोपाठ अमरावती गाठूनही त्याने तिच्यावर बळजबरी केली. साडीचोळीच्या बहाण्याने तिच्यावर वारंवार अतिप्रसंग करणारा दुसरातिसरा कुणी नसून, तो तिचा मावसजावईच निघाल्याने पीडितासह तिच्या मावसबहिणीचे कुटुंब देखील हादरले.

२७ सप्टेंबर, १ ऑक्टोबर व १० नोव्हेंबर रोजी या घटना घडल्या. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी नितीन आशू वाणी (३५, रा. कोयाळी, ता. रिसोड, जि. वाशिम, ह.मु. भारतनगर, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, आरोपी नितीन हा पीडिताचा मावसजावई असून, तो नाशिकला राहतो. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पीडिता ही तिच्या वडिलांच्या मयतीकरिता नाशिक येथे गेली. त्यावेळी सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर नितीन हा तिला साडीचोळी करण्याकरिता नाशिक येथील घरी घेऊन गेला. तेथे असताना २७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अचानक तिच्या खोलीत शिरला. तिचा गळा आवळला तथा विषाची बाटली तिच्यासमोर नाचवत तिच्याशी बळजबरी केली.

आरोपी एवढ्यावर थांबला नाही, तर १ ऑक्टोबर रोजी तो तिला जबरदस्तीने नाशिकमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे तिचेच छायाचित्रे दाखवत त्याने पुन्हा एकदा बळजबरी केली. वाच्यता केल्यास बदनामीची धमकी देण्यात आली. त्यानंतर ती अमरावतीला परतली. आरोपी नितीननेही तिच्या पाठोपाठ अमरावती गाठले. १० नोव्हेंबरला पाडिता ही घरी एकटी असल्याची संधी साधत तो तिच्या घरात शिरला. पुन्हा तिचेच अश्लील फोटो तिच्यासमोर नाचवत त्याने तिसऱ्यांदा तिचे सर्वस्व लुटले. विष पाजून जिवाने मारण्याची धमकी देण्यात आली.

नात्याचा विचार

मावसजावयाचे कृत्य उघड केल्यास मावसबहिणीचा संसार विस्कटेल, नातेही दुरावेल, त्यासमोर जाऊन आरोपीने विष देऊन जिवाने मारण्याची धमकी दिल्याने नाशिकमधील अत्याचारानंतर देखील तिने त्या कृत्याची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, नाशिक पाठोपाठ तो अमरावतीलाही पोहोचला. येथे देखील अत्याचार करण्यात आला. त्यामुळे ती नखशिखांत हादरली. अन् तिने ६ डिसेंबर रोजी नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठले. तेथे सहायक पोलीस निरीक्षक कविता पाटील यांच्याकडे तिने आपबिती कथन केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी नितीनविरुद्ध गुन्हा दाखल केला.

महिलेच्या तक्रारीवरून नाशिक येथील एकाविरुद्ध अतिप्रसंगांचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळ नाशिकचे असल्याने तपासासाठी तो गुन्हा नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात येईल.

प्रवीण काळे, ठाणेदार, नांदगाव पेठ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण