शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
4
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
5
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
6
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
7
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
8
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
9
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
10
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
11
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
12
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
13
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
15
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
16
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
17
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
18
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
19
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
20
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

फक्त पाहिले रागाने म्हणून 'गेम' केला तिघाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 15:49 IST

रागाने पाहत असल्याचा गैरसमजातून वचपा म्हणून ३५ दिवसांनी एका तरुणाला तिघांनी चाकूने भोसकून ठार केले. अमरावतीच्या फ्रेजरपुरा येथे २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. 

ठळक मुद्देजुने वैमनस्य, पुन्हा चायना चाकूतिघेही अटकेत : फ्रेजरपुरा येथे रक्तरंजित थरार

अमरावती : जुन्या वादातून तरुणाला चाकूने सपासप वार करत संपवल्याची घटना अमरावतीच्या फ्रेझरपुरा येथे सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटकेत घेतले.

रस्त्याने जात असताना समोरचा तरुण रागाने पाहत असल्याचा गैरसमज करीत त्यातून मोठा वाद जन्माला आला. शिवीगाळ झाली. लोकही जमा झाले. चाकू काढून पाहून घेण्याची धमकीदेखील देण्यात आली. मात्र, वाद वाढू नये, म्हणून त्यावेळी पोलीस ठाण्याची पायरी कुणी चढले नाही. त्या वादाचा वचपा म्हणून ३५ दिवसांनी एका तरुणाला तिघांनी चाकूने भोसकून ठार केले. फ्रेजरपुरा येथील कुळसंगे यांच्या घरासमोर २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. यश तिलकचंद मंडले (२१, रा. फ्रेजरपुरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

पानटपरीचालक यशच्या खुनाच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी लागलीच ललित ऊर्फ बिट्टू फुलचंद गौतम (तिवारी)(२५, यशोदानगर नं. १), साहिल देवीदास चांदेकर (२०, उत्तमनगर गल्ली नं. १) व अनिकेत जयश्रीराम सुरसाऊत (२१, नमुना गल्ली नं. ६) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४१, ३४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी मृताचा मोठा भाऊ शुभम मंडले याने २६ ऑक्टोबर रोजी पहाटे तक्रार नोंदविली.

यश ऊर्फ मटरू हा त्याच्या लहान चुलतभावासोबत पानठेल्याचा माल आणण्यासाठी बाजारात गेला. सायंकाळी ७ च्या सुमारास ते परत येत असताना कुळसंगे यांच्या घरासमोर यशची दुचाकी अडविली. साहिल चांदेकरने यशला पकडून दुचाकीच्या खाली पाडले, तर बिट्टू तिवारी याने यशच्या छातीवर, पोटावर, पाठीवर चाकूने अनेक वार केले. अनिकेत सुरसाऊतने यशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यशला रक्तबंबाळ स्थितीत तेथेच टाकून तिघांनीही तेथून पळ काढला. त्याला तातडीने इर्विनमध्ये हलविण्यात आले. तेथून दोन खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास यशचा मृत्यू झाला. पुढील तपास ठाणेदार राहुलकुमार आठवले, पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत.

अशी आहे पार्श्वभूमी

गणपती विसर्जनाच्या दिवशी २० सप्टेंबर रोजी संतोष भिमले याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता. यश व शुभम मंडले हे दोघे भाऊ तेथे जेवण करण्यास गेले. रात्री १२ च्या सुमारास ते भिमले याच्या घराच्या बाहेर उभे असताना यशच्या ओळखीचा ललित ऊर्फ बिट्टू तिवारी हा तेथून पायी जात होता. यश त्याच्याकडे पाहत असल्याने बिट्टूने रागाने काय पाहतो, अशी विचारणा केली. यशला शिवीगाळदेखील करण्यात आली होती. त्या वैमनस्यातून यशला जिवे मारण्यात आले, अशी तक्रार शुभम मंडले याने नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी