शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

धक्कादायक! प्रेमविवाहाच्या वादातून थोरल्याने धाकट्याला संपविले

By प्रदीप भाकरे | Updated: January 18, 2023 18:17 IST

लोणी ठाण्याच्या हद्दीतील काजना येथील घटना : आरोपी पसार

अमरावती : धाकट्याने आपल्यापूर्वीच प्रेमविवाह केल्याने सामाजिक बदनामी झाली, असे थोरल्या भावाला वाटले. त्यातून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत होऊन थोरल्याने धाकट्या भावाचा धारदार शस्त्राने हल्ला चढवून खून केला. ही धक्कादायक घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काजना येथे १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. सुधीर चरणदास घरडे (२७, रा. काजना) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी सचिन उर्फ सतीश चरणदास घरडे (३०, रा. काजना) याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, सुधीरने काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला. थोरला भाऊ सचिनला ते रुचले नाही. त्यावरून सचिन हा धाकटा भाऊ सुधीरसोबत नेहमी वाद घालत होता. मंगळवारी सायंकाळी याच कारणावरून दोघा भावांमध्ये घरासमोरच वाद झाला. या वादात सचिनने सुधीरवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला.

सुधीर रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यानंतर सचिन तेथून पसार झाला. हा प्रकार सुधीरची पत्नी कशीश (१९) यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने सुधीर यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सुधीर यांना मृत घोषित केले. पोटात दोन वार आहेत.

आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना

घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी मृतक सुधीरची पत्नी कशीश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सचिनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार मिलिंदकुमार दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीच्या शोधार्थ पोलीस ठाण्याची दोन पथके पाठविण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे शाखा देखील समांतर तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती