शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्डकप हरण्याचा वाद; भावाने केली भावाची हत्या, वडील जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 15:19 IST

अंजनगाव बारी येथील घटना; आकस्मिक मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल

बडनेरा (अमरावती) : दारूच्या नशेत दोन भाऊ व वडिलांमध्ये वर्ल्डकप हरण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात भावाने भावाचाच खून केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अंजनगाव बारी येथे घडली. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

अंकित रमेश इंगोले (२८) असे मृताचे नाव आहे. प्रवीण रमेश इंगोले (३२) व रमेश गोविंद इंगोले (६५, तिघेही राह. अंजनगाव बारी) व अंकितमध्ये तो वाद झाला.

रविवारी रात्री साडेआठ ते अकराच्या सुमारास वडील आणि दोन सख्खे भाऊ घरातच दारू पिऊन बसले होते. क्रिकेट मॅच हरण्यावरून त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, आरोपीने शिवीगाळ केली. या सुमारास वडिलांनी आरोपी जवळचा मोबाइल हिसकला व त्याला फेकून मारला या रागात आरोपीने घरातून लोखंडी सलाख आणून अंकित यास गंभीर जखमी केले तसेच वडिलांच्या पायावरदेखील मारहाण केली. 

या हाणामारीत अंकित याचा मृत्यू झाला व वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवि ३०२, ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरू आहे. सहायक पोलीस आयुक्तांनी देखील घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती