शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तो अवचित म्हणाला, चल पळून जाऊ! तिने नकार देताच केली मारहाण अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 18:08 IST

त्याने तिला रस्त्यात अडवले व आताच माझ्या गाडीवर बस, चल आपण लग्न करू, अशी बतावणी केली. तिने नकार देताच त्याने तिला बळजबरीने दुचाकीवर बसविले. पुढे नकार दिल्याने तिला चालत्या दुचाकीवरून खाली ढकलून दिले. यात ती गंभीर जखमी झाली.

ठळक मुद्देतरुणीला रस्त्यात अडविले दुचाकीहून ढकलून दिल्याने झाली जखमी

अमरावती : तिच्या ध्यानीमनी नसताना तो अचानक सामोरा आला. ‘चल पळून जाऊन लग्न करू’, असा म्हणाला. नकार देताच त्याने तिला बळजबरीने दुचाकीवर बसविले. पुढे नकार दिल्याने तिला चालत्या दुचाकीवरून खाली ढकलून दिले. यात ती गंभीर जखमी झाली. ही थरारक घटना एका खेड्यात घडली.

फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या परिचयातील आहेत. दरम्यान, २५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तरुणी ही तिच्या मामीसोबत मैत्रिणीकडे जात होती. दरम्यान, अमित दादाराव वानखडे (२१, नांदुरा पिंगळाई, ता. मोर्शी) हा तिला रस्त्यात भेटला. आताच माझ्या गाडीवर बस, चल आपण लग्न करू, अशी बतावणी त्याने केली. तिने नकार दिला असता, त्याने तिला मारहाण केली व बळजबरीने दुचाकीवर बसविले. दुचाकी थांबव, मला उतरायचे आहे, उतरवून दे, अशी विनवणी तिने केली. मात्र, दुचाकी न थांबवता त्याने तिला ढकलून दिले. त्यामुळे तिच्या डाव्या खांद्यासह डोक्याच्या मागील बाजूला गंभीर दुखापत झाली.

लग्न होऊ देणार नाही

ढकलून देऊन अमितने दुचाकी थांबविली. तथा माझ्याशी लग्न करणार नसशील, तर तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे त्या तरुणीने वलगाव पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अमित वानखडे (नांदुरा पिंगळाई) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वलगाव ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सावरकर हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी