शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘एमडी’ची ऑन कॉल विक्री; डिलिवरी मॅन अटकेत

By प्रदीप भाकरे | Updated: January 20, 2023 17:13 IST

मोबाईल तपासणार : गुन्हे शाखेची इतवारा बाजाारा कामगिरी

अमरावती : इतवारा बाजारात ‘एमडी’ची विक्री करणाऱ्या डिलिवरी मॅन अटक करण्यात आली. त्याच्याकडून २२.५ ग्रॅम मेफेड्रॉन ‘एमडी’ ड्रग्स जप्त करण्यात आले. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली. मोहम्मद वजीद वल्द अब्दुल नासीर कुरेशी (४०) रा. गवळीपुरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मोहम्मद वजीद हा शुक्रवारी इतवारा बाजार परिसरातील एका गुळ भंडारजवळ एमडी ड्रग्ज विक्री करीत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने इतवारा बाजार गाठून मोहम्मद वजीदला अटक केली. त्याच्याकडून २२.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज या अंमली पदार्थासह एकूण १ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मोहम्मद वजीदविरुद्ध शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, राजूआप्पा बाहेणकर, फिरोज खान, सतीष देशमुख, सुरज चव्हाण, निवृत्ती काकड, सुधीर गुडधे यांनी केली.

रिसिव्हर कोण ते तपासणार

याप्रकरणी एमडी विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेने पकडले असले, तरी तो ती एमडी ड्रग्ज नेमका कुणाला विकणार होता, यापुर्वी त्याने ती ड्रग्स कुणाला विकली, कुठून आणली, या दिशेने सखोल तपास केला जाणार आहे. त्यासाठी त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला जाणार आहे. त्यातून शहरात फोफावलेले एमडी नेमके येते कुठून, याचा उलगडा केला जाणार आहे.

एमडी ड्रग्स म्हणजे काय?

कॉलेजच्या मुला-मुलींमध्ये ‘म्यॅव म्यॅव’ आणि ‘एम-कॅट’ अशा सांकेतिक भाषेत ‘फेमस’ असललेल्या ‘एमडी ड्रग’ या अंमली ‘विशिष्ट डिलिव्हर्स’ च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे. मेफ, बबल्स, ड्रोन, म्यॅव म्यॅव आणि एम-कॅट अशी त्याची वेगवेगळी टोपणनावे आहेत. युवा वर्गाला व्यसनाधीन करणारा हा पदार्थ शरीरासाठी घातक आहे. डिसेंबर २०२२ मध्ये देखील सीपींच्या विशेष पथक व नागपुरी गेट पोलिसांनी एमडी ड्रग्स जप्त केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थAmravatiअमरावती