शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

किस्सा नही... कहानी बन गई! आभासी जगाने घेतला दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 12:32 IST

हर्षा तिच्या बहिणीसह फोटेसेशन करत असताना पाय घसरून ती शेततळ्यातील पाण्यात पडली व बुडाली. तिला वाचविण्यासाठी बाजीलालनेही तळ्यात उडी घेतली मात्र त्यात त्याला यश आले नाही व दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

पथ्रोट (अमरावती) : ‘सब्र कर मेरी जान... किस्सा नही... अपनी कहानी होगी!’ हे शेवटचे वाक्य समाजमाध्यमावर आपला व्हिडीओ अपलोड करणाऱ्या बाजीलालचे होते. शेततळ्यात बुडालेल्या हर्षाला वाचविण्यासाठी उतरलेल्या बाजीलालचा अखेर अंत झाला. या दोघांचे मृतदेह सोमवारी सकाळी ९ वाजता शेततळ्यातून काढण्यात आले.

पोलीस सूत्रांनुसार, कुष्टा शिवारातील हरिदास नाथे यांच्या शेतातील शेततळ्यात रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास गावातील हर्षली विनोद वांगे (१३) बुडाली. तिला वाचविण्यासाठी उतरलेला बाजीलाल मुन्ना कासदेकर (२५) हादेखील बुडाला. त्यांच्यासमवेत असलेल्या तरुणाने या दोघांना वाचविण्यासाठी उडी घेतली. तो गटांगळ्या खात असल्याचे पाहून नागरिकांनी त्याला वाचविले. सोमवारी सकाळी दोघांचे मृतदेह बचाव पथकाने शोधून पाण्याबाहेर काढले. पथ्रोट पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरिता अचलपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. शवविच्छेदनानंतर दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, नाथे यांच्या शेतात बाजीलाल यांचे वडील मुन्ना कासदेकर रखवालदार आहेत. या शेतातील शेततळ्याभोवती चित्रीकरण करून बाजीलाल हा इन्स्टाग्रामवर पोस्ट करायचा. रविवारी सायंकाळी हर्षा ही बहीणीसोबते फोटोसेशन करीत असताना पाय घसरून पाण्यात पडली. बहिणीने शेतात काम करणारा बाजीलाल याला मामा वाचवा, अशी साद घातली. बाजीलाल धावत तळ्यात उतरला परंतु तिला वाचवताना बाजीलालदेखील बुडाला. हर्षालीच्या पश्चात दोन बहिणी तर मृत युवकास एक भाऊ आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार अशोक पळस्पगार, हेमंत येरखडे, नरेश धाकडे, विजय गायकवाड करत आहे.

सब्र कर मेरी जान...

बाजीलालने रविवारी आभासी माध्यमावर चित्रफीत टाकली. त्यात ‘सब्र कर मेरी जान... किस्सा नही... अपनी कहानी होगी’ अशा आशयाचा मजकुर त्याच्या तोंडी आहे. काळाला मात्र ‘सब्र’ झाले नाही. त्याने मित्रवर्गातून या उमद्या व्यक्तिमत्त्वाला हिरावून नेले.

टॅग्स :Accidentअपघातdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूAmravatiअमरावती