शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव धरणाला 'कोरड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:58 IST

तिवसा तालुक्याची तृष्णातृप्ती भागविणाऱ्या माळेगाव धरणाला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरड पडली आहे. हे धरण आटण्याची घटिका समीप आल्याने त्यातील जलजीवसृष्टीचा नाश झाला आहे. त्यामुळे नजीकच्या गावांवर येत्या उन्हाळ्यात जलसंकट निर्माण होण्याचे दुश्चिन्हे आहेत.

ठळक मुद्देजलजीवसृष्टी नष्ट : विहिरीच्या पाणी पातळीवर परिणाम

अमित कांडलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज(मोझरी) : तिवसा तालुक्याची तृष्णातृप्ती भागविणाऱ्या माळेगाव धरणाला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरड पडली आहे. हे धरण आटण्याची घटिका समीप आल्याने त्यातील जलजीवसृष्टीचा नाश झाला आहे. त्यामुळे नजीकच्या गावांवर येत्या उन्हाळ्यात जलसंकट निर्माण होण्याचे दुश्चिन्हे आहेत.तिवसा तालुक्यातील माळेगाव धरण हे दरवर्षी पूर्णपणे भरते. त्यावर अनेक गावांचा पाणीपुरवठा निर्भर आहे. परिसरातील शेकडो एकर शेतीचे ओलित करण्याचा तो एकमेव जलस्रोत आहे. मात्र, यंदा अपुºया पावसामुळे हे धरण भरलेच नाही. परिणामी उन्हाळा सुरू होण्याआधीच हा प्रमुख जलस्त्रोत पूर्णपणे रिकामा झाला आहे. त्यामुळे गुरुदेवनगर, मोझरी परिसरातील विहिरींतील पाणी पातळी घटणार आहे. त्याचे दुष्पपरिणाम आतापासूनच दिसण्यास सुरवात झाली आहे. परिसरातील अनेक ग्रामपंचायतींना पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. यावरून पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेण्याजोगी आहे. आगामी दिवसांत त्यात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. या धरणाच्या पाण्यावर ओलित करून मोठ्यप्रमाणात उत्पादन घेतले जाते. सोबतच मोझरी गाव परिसरातील अनेक उद्योग धंद्यातही या धरणाच्या पाण्याचा दरवर्षी मुबलक उपयोग होतो. या धरणाच्या पाण्यामुळे नजिकच्या कित्येक किलोमीटर परिसरातील भूगभार्तील पाणी पातळी उंचावते. पर्यायाने गुरुकुंज मोझरी परिसरातील विहिरींतील पाण्याची पातळी कायम राहण्यास मोठी मदत होते. पण यंदा धरणातच पाणी नसल्याने य्अनेक घटकांवर परिणाम होणार आहे.पंधरा वर्षांत माळेगाव धरण कधीच पूर्णपणे कोरडे झालेले नाही, हे विशेष. परंतु, यंदा जानेवारीतच ही स्थिती ओढवल्याने भीषण दुष्काळ राहणार असल्याचे चित्र धरणाच्या एकूण परिस्थितीवरून दिसून येते. पाण्याची मुबलकता असताना या धरणात मत्स्यपालन करून मासेमारी केली जात असे. पण दुसरीकडे धरण आटल्यामुळे त्यातील सुपीक माती जेसीबीच्या माध्यमातून उत्खनन करून ट्रॅक्टरच्या साह्याने पळविली जात आहे.

टॅग्स :Damधरण