शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; अंजनगाव सुर्जी येथे परिरक्षकासह पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 13:10 IST

दहावीच्या परीक्षा प्रक्रियेत अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला असून, इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता त्या खाजगी इसमाकडे लपवून ठेवल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

प्रदीप भाकरे ​अमरावती :दहावीच्या परीक्षा प्रक्रियेत अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला असून, इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता त्या खाजगी इसमाकडे लपवून ठेवल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी मुख्य परिरक्षकासह तीन ज्ञात इसम आणि दोन अज्ञात विद्यार्थ्यांविरुद्ध बीएनएस आणि महाराष्ट्र परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना शनिवारी उशिरा रात्री अटक करण्यात आली आहे.

 इयत्ता दहावीच्या इंग्रजी विषयाची परीक्षा पार पडल्यानंतर सोडवलेल्या उत्तरपत्रिका विहित वेळेत कस्टडीमध्ये जमा करणे बंधनकारक होते. मात्र, आरोपींनी संगनमत करून दोन उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता त्या एका खाजगी इसमाकडे लपवून ठेवल्या. परीक्षेच्या पवित्रतेचा भंग करून गैरहेतूने हा प्रकार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

​उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद अमरावती रजनी शिरभाते यांनी दिलेल्या तक्रारीवरून या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे: परिरक्षक ​सुधीर द. खोडे, उप परिरक्षक ​सुशीलकुमार अभ्यंकर व ​अनिल हाडोळे या खाजगी इसमासह ​दोन अज्ञात विद्यार्थीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील खोडे व हाडोळे यांना अटक करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Major Cheating in 10th Exam; Five Booked, Two Arrested

Web Summary : A major cheating scandal in the 10th board exam has surfaced in Anjangaon Surji. Five individuals, including the chief supervisor, have been booked for concealing answer sheets. Two have been arrested for violating exam regulations.