शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

मोलकरीन निघाली चोर, मदतनीसही जेरबंद; २.४३ लाखांचे दागिने जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: November 16, 2023 18:08 IST

महिनाभरात उलगडा

अमरावती : येथील एका माजी नगरसेविकेच्या घरातून २.४३ लाख रुपये किमतीचे दागिने चोरणाऱ्या मोलकरीण महिलेला अटक करण्यात आली. ते दागिने विकण्यासाठी तिला सहाय्य करणारा आरोपी देखील गजाआड करण्यात गाडगेनगर पोलिसांना यश आले. १४ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी एका संशयित महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.

संध्या विजय चापळकर (वय ४० वर्ष, रा. वडरपुरा) व अनिस अहमद गुलाम गिलानी (वय ४२ वर्ष, रा. मुस्तफा नगर, हैदरपुरा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. माजी नगरसेविका या आपल्या बहिणीसह कांतानगर येथील घरी असताना चोरीचा प्रकार उघड झाला होता. लुंगारे यांच्या पर्समधील सोन्याची अंगठी,चेन, ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली हिऱ्याची अंगठी व ४ हजार रुपये रोख रक्कम असा २.४३ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना गाडगेनगर पोलिसांनी लुंगारे यांच्या घरात घरकाम करणारी महिला संध्या चापळकर हिच्याबाबत माहिती संकलित केली. खात्री पटल्यानंतर तिला १४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. चोरी केलेले दागिने विक्री करण्यास मदत करणारा अनिस अहमद गुलाम गिलानी याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेला २.४३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यांनी केली कारवाई

पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, हवालदार सुभाष पाटील, आस्तिक देशमुख, गजानन बरडे, सुशांत प्रधान, प्रशांत वानखडे, सागर धरमकर, जयसेन वानखडे, जाकिर खान यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती