शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

Bachchu Kadu: मै झुकेगा नहीं! पहिली वेळ होती, पण पुन्हा माफी नाही; बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 15:28 IST

खोके आणि किराणा वाटपावरून गेल्या आठवड्यात आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात झालेला वाद काही अंशी शमला.

अमरावती- 

खोके आणि किराणा वाटपावरून गेल्या आठवड्यात आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात झालेला वाद काही अंशी शमला. आज बच्चू कडू यांनी जशास तसे उत्तर देण्यासाठी आणि आपली पुढील भूमिका जाहीर करण्यासाठी अमरावतीच्या नेहरू मैदानावर मंगळवारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला. त्याकरिता राज्यभरातून प्रहारचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. या मेळाव्यात बच्चू कडूंनी रवी राणा यांना पहिलीच वेळ होती म्हणून माफ करतोय, पण यापुढे अशी आगळीक घडली तर पुन्हा माफी नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे. 

रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडूंनी आपली भूमिका केली स्पष्ट, म्हणाले...

"रवी राणांनी झालेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्ती केली त्याचा मी आनंद व्यक्त करतोय. नाहीतर उगाच आम्हाला हातपाय हलवायला लागले असते. त्यांनी मोठेपणा घेतला आणि त्यांना आपली चूक लक्षात आली. तुम्ही दोन पावलं मागे घेतली तर आम्ही चार पावलं मागे घेऊ. आम्हाला आमची एनर्जी अशा कामात वाया घालवायची नाही. त्यामुळे हा विषय आता संपला आहे आणि राज्यातील कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या कामासाठी वेळ सत्कारणी लागावा यासाठी आम्ही झटत राहू", असं बच्चू कडू म्हणाले. 

बच्चू कडू यांनी यावेळी प्रहार संघटनेनं आजवर गोरगरीब जनता, अपंग व्यक्ती, शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. तसंच बंडखोरीच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. "आता पवारांनी २०१४ साली भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. गरीबाची पोरगी पळाली की ती पळाली, तर श्रीमंताची पोरगी पळाली तर लव्ह मॅरेज होतं अशातला हा प्रकार आहे. आज कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत ते मला सांगा. खरंतर बंडखोरच आज पहिल्या पंक्तीत आहेत. आज सोशल मीडिया सुद्धा पैशांनी चालतो. जो चलता है वही बिकता है. आता एकदा चूक झाली म्हणून ठिक आहे. पहिली वेळ आहे म्हणून माफ करतोय. पण प्रहारच्या वाटेत यापुढे कुणी येईल तर प्रहारचा वार कसा आहे ते आम्ही दाखवून देऊ. आम्ही गांधींना मानतो पण भगतसिंग देखील आमच्या डोक्यात आहे. यापुढे आमच्या वाट्याला गेल्यास माफ करणार नाही", असं बच्चू कडू म्हणाले. 

भविष्यात प्रहारचे १० आमदार स्टेजवर असतीलबच्चू कडू यांनी प्रहार संघटना पुढील काळात राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. "प्रहारची ही तर सुरुवात आहे. आज स्टेजवर दोन जण आहेत. पण येत्या काळात स्टेजवर १० जण असतील. आम्ही म्हटलं तर सरकार बसलं पाहिजे. आम्ही म्हटलं तर सरकार उठलं पाहिजे. अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी सरकारकडून कामं करून घेऊ. प्रहारचं नातं हे जातीशी नाही. आपलं नातं दु:खीतांसोबत जोडलं गेलं पाहिजे", असं बच्चू कडू म्हणाले. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू