शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

महावितरण होणार पेपरलेस, चार प्रकारचे मोबाईल अ‍ॅप्स विकसित

By admin | Updated: August 18, 2016 00:10 IST

महावितरणद्वारा चार प्रकारचे मोबाईल अ‍ॅप्स विकसित करुन कामकाज पेपरलेस करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली.

अमरावती : महावितरणद्वारा चार प्रकारचे मोबाईल अ‍ॅप्स विकसित करुन कामकाज पेपरलेस करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कागदांचा वापर कमी करुन संगणक व मोबाईलवर वीजबिल मिळणे तसेच बिल भरणे ग्राहकांना शक्य होईल.वीज ग्राहक, कर्मचाऱ्यांसाठी महावितरणद्वारा जुलै महिन्यात उपलब्ध ‘मोबाईल अ‍ॅप्स’ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत ३ लाख ७० हजार वीज ग्राहकांनी हे अ‍ॅप्स डाऊनलोड केले आहेत तर ५६ हजार ग्राहकांनी महावितरणच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केले आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’मध्ये पहिल्या १५ फ्री बिझनेसमध्ये महावितरणच्या या मोबाईल अ‍ॅप्सचा समावेश आहे. विजेसंबंधी सर्व सेवा ग्राहकांना सहजरित्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असे हे चार नवीन मोबाईल अ‍ॅप्स विकसित केले आहेत. संगणक व स्मार्ट फोनच्या या युगात ‘पेपरलेस’ व्यवहाराच्या दृष्टीने ग्राहकांसाठी हे पाऊल नक्कीच फायदेशीर ठरणारे आहे. घरबसल्या विविध माहिती या अ‍ॅप्सद्वारे मिळू शकते. या अ‍ॅप्समध्ये विविध पर्याय आहे. वीजबिलांचा भरणा, वीजसेवांबाबत तक्रारी, मीटर रिडिंग पाठविणे, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याच्या सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या अनेक तक्रारींचा निपटारा घरी बसूनच करता येईल. यामुळे वेळ आणि श्रम वाचणार आहेत. (प्रतिनिधी)सोशल मीडियावर अ‍ॅप्सची माहिती महावितरणने ग्राहकांसाठी विकसित केलेले अ‍ॅप राज्यभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचावे व त्यांना या अ‍ॅप्सचा फायदा व्हावा, यासाठी त्याचा प्रसार-प्रचार होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घऊन महावितरणने सोशल मिडियावर अ‍ॅप्सची माहिती सांगणारे ‘जिंगल’ टाकले आहे. व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक आदी सामाजिक संकेतस्थळावरुन ग्राहकांना अ‍ॅप्सची माहिती देण्यात येत आहे.