शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत काम न करणाऱ्या कंपन्यांना 'महाऊर्जा'ची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 11:14 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मेळघाटातील १६९ सौर कृषिपंपांचे काम प्रगतिपथावर

लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यामध्ये महाऊर्जाकडून आजतागायत ४९८ विविध क्षमतांचे सौर कृषिपंप व धारणी तालुक्यामध्ये १३१ विविध क्षमतांचे सौर कृषिपंप आस्थापित व कार्यान्वित करण्यात आले असल्याचे मेडाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

चिखलदरा तालुक्यात १८ पंपांचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले, तर संबंधित कंपन्यांना अल्टिमेटम देत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. चिखलदरा तालुक्यातील १३२ सौर कृषिपंप तसेच धारणी तालुक्यातील ३७ सौर कृषिपंप आस्थापनांचे काम प्रगतिपथावर असून, लाभार्थ्यांना सौर कृषिपंप साहित्य प्रकल्पस्थळी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. लाभार्थ्यांनी सौर पुरवठादाराची निवड केल्यानंतर चार महिन्यांमध्ये सौर पंप कंपन्यांना आस्थापित करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रगतिपथावर काम असल्याचे मेडाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी पत्रात स्पष्ट केले. 

विलंब करणाऱ्या कंपन्यांना नोटीस अमरावती जिल्ह्यात सौर पंप आस्थापित करण्यास विलंब करणाऱ्या कंपन्यांना महाऊर्जा मुख्यालयातर्फे तसेच या कार्यालयातर्फे नोटीस, पत्रे देण्यात आलेली असून, निर्धारित वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांचे काम इतर कंपन्यांना वळते करण्याविषयी मुख्यालयास या कार्यालयातर्फे शिफारस करण्यात आली असल्याचे प्रफुल्ल तायडे यांनी पत्रात स्पष्ट केले.

कंपन्यांची घेतली आढावा बैठकविभागात काम करणाऱ्या संपूर्ण कंपन्यांची आढावा बैठक ८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण प्रलंबित कामाचा निपटारा करण्याविषयी सक्त सूचना त्यामध्ये देण्यात आल्या आहेत. प्राप्त सर्व तक्रार अर्जावर कार्यवाही करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तांत्रिक अधिकाऱ्यांनी तत्काळ शेतकऱ्यांशी संपर्क करावा, असे आदेशही देण्यात आले आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती