शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचे निकाल स्पष्ट; भाजपचे नगराध्यक्ष किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:28 IST

Amravati : तब्बल चार वर्षांपासूनचे प्रशासकराज अखेर आज हटले आहे. जिल्ह्यात आठ ते नऊ वर्षानी झालेल्या १० नगरपरिषद व दोन नगरपंचायतींसाठी निकाल स्पष्ट झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तब्बल चार वर्षांपासूनचे प्रशासकराज अखेर आज हटले आहे. जिल्ह्यात आठ ते नऊ वर्षानी झालेल्या १० नगरपरिषद व दोन नगरपंचायतींसाठी निकाल स्पष्ट झाला आहे. भाजपला ६, काँग्रेस २, शिंदेसेना, उबाठा, प्रहार व अपक्ष प्रत्येकी एक अशा बाराही ठिकाणचे निकाल लागले आहेत.  वरूड नगरपरिषदमध्ये भाजपचे ईश्वर सलामे, मोर्शी येथे शिंदेसेनेच्या प्रतीक्षा गुल्हाने, धारणी येथे भाजपचे सुनील चौथम, चिखलदरा येथे काँग्रेसचे शेख अब्दूल शेख हैदर, अचलपूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या रूपाली माथने, अंजनगाव सुर्जी येथे भाजपचे अविनाश गायगोले, दर्यापूर येथे काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकडे, शेंदूरजना घाट येथे भाजपचे हरिभाऊ वरखडे, धामणगाव रेल्वे  येथे भाजपच्या अर्चना राेटे, चांदूर रेल्वे नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार प्रियंका विश्वकर्मा, नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीत उबाठा गटाच्या प्राप्ती मारोटकर आणि चांदूर बाजार नगरपरिषदेत प्रहारच्या मनीषा नांगलिया विजयी झाले. 

यावेळी तुरळक अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष स्वतंत्र लढले. शिवाय प्रहार, युवा स्वाभिमान, वंचित बहुजन आघाडीसह अन्य काही पक्ष व स्थानिक आघाड्या, बंडखोर व काही अपक्ष उमेदवारांमध्ये काट्याची लढत झाली. धामणगाव वगळता बहुतेक ठिकाणी अंतिम क्षणात तिहेरी लढती झाल्या.

जिल्ह्यात दोन टप्प्यात म्हणजेच २ व २० डिसेंबरला झाल्या. यामध्ये १५५ प्रभागात २७८ सदस्य निवडल्या जातील. सदस्यपदासाठी ६१२ स्त्री व ६३८ पुरुष असे १२५० तर १२ नगराध्यक्ष पदांकरिता ४७ स्त्री व २४ पुरुष असे उमेदवार उभे होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Nagar Palika Election Results: BJP Dominates, Congress Secures Some Wins

Web Summary : Amravati district's Nagar Palika elections conclude after four years. BJP wins six, Congress two, and Shinde Sena, Ubaatha, Prahar, and independents secure one each. Twelve locations' results are out, marking significant shifts in local governance.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५AmravatiअमरावतीMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५