शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

Maharashtra Election 2019 ; 'भाजपानुकूल मतदारसंघ ऐनवेळी सेनेला देणे नडले'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 01:42 IST

मेळघाटात झालेल्या पराभवाचे समीकरण सूर्यवंशी यांनी मांडले. मेळघाट हा आदिवासींचा प्रांत अशीच ओळख असली तरी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गैरआदिवासींची संख्यादेखील तेथे महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. गवळी, मालविय, खाटीक, कलाल, गवलान, बलई या समाजघटकांचा त्यात समावेश आहे. या गैरआदिवासी मंडळींचे एकत्रित मतदान तब्बल ३५ ते ३८ टक्के आहे.

ठळक मुद्देभाजपच्या मतांचा टक्का वाढला : दर्यापुरात 'स्थानिक नेतृत्त्वा'ची घाई, मेळघाटात गैरआदिवासी मतांचा फटका

गणेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभाजपच्या मतांची टक्केवारी वाढली असली तरी विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आणि धक्कादायकच आहेत. त्यासाठीची कारणमीमांसा आम्ही सुरू केली आहे. सामान्यांच्या अपेक्षापूर्तीत संघटना कुठे कमी पडली, हेदेखील आम्ही जाणून घेणार आहोत. तसे बदल करून चूक सुधारली जाईल , अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) दिनेश सूर्यवंशी यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. जिल्ह्यात भाजपचे पानीपत का झाले, याची चर्चा तोंडोतोंडी आहे. संघटनेचा प्रमुख चेहरा असलेले दिनेश सूर्यवंशी हे पराभवाची कारणमीमांसा कशी करतात, हे आम्ही 'लोकमत'च्या वाचकांसाठी जाणून घेतले.मेळघाटात झालेल्या पराभवाचे समीकरण सूर्यवंशी यांनी मांडले. मेळघाट हा आदिवासींचा प्रांत अशीच ओळख असली तरी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गैरआदिवासींची संख्यादेखील तेथे महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. गवळी, मालविय, खाटीक, कलाल, गवलान, बलई या समाजघटकांचा त्यात समावेश आहे. या गैरआदिवासी मंडळींचे एकत्रित मतदान तब्बल ३५ ते ३८ टक्के आहे. आदिवासींसाठी आपुलकीचा असलेला; परंतु गैरआदिवासींमध्ये असुरक्षितता निर्माण करणाऱ्या पेसा या कायद्याचा नियोजनबद्धरीत्या अपपप्रचार करण्यात आला. तो खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो. त्याचा परिणाम झाला असा की, कधी नव्हे ते गैरआदिवासी मतदार भाजप उमदेवाराविरुद्ध ताकदीने एकवटले. घाटपायथ्याला अचलपूरजजीक ९० बुथ होते. 'पेसा'च्या बागुलबुव्यामुळे तेथेही अपक्ष राजकुमार पटेलांना एकतर्फी मतदान झाले.दर्यापुरात अनुकूल स्थिती असताना भाजपला 'डॅमेज' होईल, अशी स्थिती भाजपच्या 'स्थानिक नेतृत्त्वा'ने निर्माण केली. लोकसभेत हार झाल्यानंतर सीमा सावळे या नवख्या नि परक्या उमेदवाराला दर्यापुरातून लढविण्याची आश्चर्यकारक घाई केली गेली. सावळेंना तिकीट न मिळाल्यामुळे रमेश बुंदिले यांनी विकास केला नसल्याचा प्रचार सावळेंनी केला. स्वत: सावळे यांनीही १८-१९ हजार मते घेतली. सावळेंना शब्द देऊन त्यांच्या आशा पल्लवित करण्याची घाई करणाºया 'स्थानिक नेतृत्त्वा'ने सावळेंना भाजपविरुद्ध बंडखोरी करून देण्याची जबाबदारी मात्र पार पाडली नाही. पक्षाला त्याची किंमत चुकवावी लागली. 'स्थानिक नेतृत्त्व' म्हणजे कोण, या प्रश्नाच्या उत्तरात माझ्यासकट कुणीही असू शकेल, असे उत्तर त्यांनी दिले.मोर्शी मतदारसंघाला मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा सोपविल्यावर मतदारसंघ अनुकूल असणे अपेक्षित होते. तसे नसेल तर तो अनुकूल करण्यासाठीची आवश्यक ती उपाययोजना करता यावी, असे सामर्थ्य पक्षाने पालकमंत्री अनिल बोंडे यांना बहाल केले होतेच. काही अंतर्गत बाबींवर मी त्यांना अवगत केले होते; अंतिम निर्णय त्यांना घ्यावयाचे होते.तिवस्याबाबत कमालीचे 'कॉन्फिडन्ट' असलेले सूर्यवंशी म्हणतात, 'तेथे कमळ फुललेच असते.' मोठा कालावधी देऊन भाजपने 'नरीश' केलेला तो मतदारसंघ ऐनवेळी शिवसेनला देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला. भाजपजन नाऊमेद झाले. मी तरीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चेतवित ठेवले. नवख्या राजेश वानखडे यांनी यशोमती ठाकुरांना काट्याची टक्कर दिली, त्याचे प्रमुख श्रेय अर्थातच् भाजपच्या श्रमाला द्यावे लागेल. आताही सांगतो, तेथे कमळावर उमेदवार उभा केला असता, तर यशोमतींना पराभूत व्हावेच लागले असते!तिवस्याचीच पुनराववृत्ती अचलपुरात झाली. ऐनवेळी मतदारसंघ शिवसेनेला दिला गेला. काय साध्य झाले ते सर्वांसोर आहेच.शिवसेनेला बडनेरा वगळता इतर दोन मतदारसंघ मुळीच सोडू नये, अशी आमची आग्रही मागणी होती. तरीही ते सेनेला देण्यामागे वरिष्ठांचे काही नियोजन असेल; पण स्थानिक पातळीवर त्याचा विपरीत परिणाम इतरही मतदारसंघांवर झाला. जिल्हाभरातील भाजप संघटनेत अनुत्साह निर्माण झाला, हा मुद्दा संघटनेला लक्षात घ्यावाच लागणार आहे. निर्णायक संख्येत असलेल्या परंपरागत मतदारांना अमरावती जिल्ह्यात प्रतिनिधीत्त्व देऊन त्यांची सन्मानपूर्वक दखल घेण्याचे राहून गेल्याचा मुद्दाही त्यांनी चर्चेदरम्यान अधोरेखित केला.हल्लीची भाजप ओबीसी, मराठा ओरीएन्टेडप्रमोद महाजन यांच्या काळात ओबीसींना संघटनेत मुख्य प्रवाहात सामिल करून घ्यावे, राज्यात संख्येने सर्वाधिक असलेल्या मराठा समाजाला नेतृत्त्वसंधी द्यावी, असा विचार मांडला गेला. तेव्हापासून भाजपात ओबीसी, मराठा मुख्य प्रवाहात आलेत.- अन् परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळलाभाजपने सातत्याने परिश्रम घेऊन अनेक मतदारसंघांची जोपासना केली. तळागाळातील कार्यकर्त्यांनीही त्यासाठी जीव ओतला. संघटनेचे कर्तव्य या नात्याने विधानसभा निवडणूक येईपर्यंत आम्ही भाजपसाठी जमिन सुपीक करवून ठेवली. ऐनवेळी मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला.

टॅग्स :amravati-acअमरावती