शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
6
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
7
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
8
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
9
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
10
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
11
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
12
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
13
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
14
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
15
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
16
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
17
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
18
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
19
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
20
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द

Maharashtra Election 2019 ; आठ मतदारसंघांत १७२ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 6:00 AM

नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकच गर्दी केली होती. शुक्रवारी आठ मतदारसंघांतून १२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सुलभा खोडके (अमरावती), रवि राणा (बडनेरा), राजेश वानखडे (तिवसा), बच्चू कडू (अचलपूर) या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

ठळक मुद्देएकूण २२९ अर्ज दाखल : बडनेरा, अमरावतीत सर्वाधिक २८; मेळघाटात सर्वात कमी १३ उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणूक नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत १७२ उमेदवारांनी २२९ अर्ज दाखल केले. अमरावती आणि बडनेऱ्यातून सर्वाधिक २८, तर मेळघाटातून सर्वात कमी १३ उमेदवार तूर्तास रिंगणात आहेत.नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकच गर्दी केली होती. शुक्रवारी आठ मतदारसंघांतून १२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सुलभा खोडके (अमरावती), रवि राणा (बडनेरा), राजेश वानखडे (तिवसा), बच्चू कडू (अचलपूर) या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अवधी आहे. त्यामुळे १७२ पैकी किती उमेदवार रिंगणात कायम राहतात, हे चित्र त्याच दिवशी सायंकाळी स्पष्ट होईल, असे निवडणूक विभागाने सांगितले.प्रचाराची रणधुमाळी ८ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावतील. त्यामुळे उमेदवारांना खºया अर्थाने मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह, नाव, पक्ष पोहोचविण्यासाठी केवळ ११ दिवस मिळणार आहेत. आठही मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षासह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. तथापि, ७ ऑक्टोबर रोजी राजकीय मैदानात कोणता पहिलवान कायम राहील, यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.धामणगाव रेल्वे मतदारसंघात वीरेंद्र जगताप, प्रताप अडसड, प्रवीण घुईखेडकर, नीलेश विश्वकर्मा, सविता कटकतलवारे, अभिजित ढेपे यांच्यासह एकूण २४ उमेदवार आहेत. बडनेरा मतदारसंघात रवि राणा, प्रीती बंड, प्रमोद इंगळे, नीलेश थेटे, राजू जामनेकर, पुरुषोत्तम भटकर, सिद्धार्थ गोंडाणे, शैलेश गवई यांच्यासह एकूण २८ उमेदवार आहेत.अमरावती मतदारसंघात सुनील देशमुख, सुलभा खोडके, मो. अलिम पटेल यांच्यासह २८ उमेदवार आहे. तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर, राजेश वानखडे, दीपक सरदार, अब्दूल नईम यांच्यासह एकूण २१ उमेदवार आहे. दर्यापूर मतदारसंघात रमेश बुंदिले, बळवंत वानखडे, रेखा वाकपांजर, सीमा सावळे, गौतम इंगळे, सागर कलाने, चंद्रकांत बोदडे, मीनाक्षी करवाडे यांच्यासह २५ उमेदवार आहेत.मेळघाट मतदारसंघात रमेश मावस्कर, राजकुमार पटेल, केवलराम काळे, लक्ष्मण धांडे, रामकिशोर जांबू, शैलेश गावंडे यांच्यासह एकूण १३ उमेदवार आहेत. अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू, बबलू देशमुख, सुनीता फिस्के, राजेंद्र गवई यांच्यासह एकूण १५ उमेदवार आहेत. मोर्शी मतदारसंघात अनिल बोंडे, वसुधा बोंडे, राजेंद्र भाजीखाये, सैयद फारूख, देवेंद्र भुयार, नंदकिशोर कुयटे यांच्यासह एकूण १८ उमेदवार आहेत.श्रीराम नेहर यांचे ‘इंजिन’ हुकलेदर्यापूर : शपथपत्र दाखल करून अनामत रक्कम व उमेदवारी अर्ज वेळेत सादर करण्यात न आल्याने मनसेचे श्रीराम नेहर यांना निवडणुकीपासून वंचित राहावे लागले. त्यांनी न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या उमेदवारी न मिळाल्याने श्रीराम नेहर यांनी मनसेकडे धाव घेतली. त्यांना शुक्रवारी मनसेचा ए, बी फॉर्म देण्यात आला. त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, उमेदवारी अर्जासोबत आवश्यक अनामत रक्कम व नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला नाही. दुपारी ३ नंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांना विनंती केली. परंतु, आता त्यांना नामनिर्देशनपत्र सादर करता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी सांगितले.

टॅग्स :amravati-acअमरावती