शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला?
2
मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप
3
Sanjay Raut : "लांडग्यानं वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होत नाही; स्वत:ला आरशात पाहावं"; राऊतांचा टोला
4
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
5
हृदयद्रावक! लग्नाआधी विपरित घडलं, मेहंदी समारंभात नाचताना नवरीला मृत्यूने गाठलं अन्...
6
तापसीने केली प्रिती झिंटासोबत स्वत:ची तुलना; म्हणाली, 'मी तिच्यासारखं होण्याचा प्रयत्न करते, कारण...'
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!
8
'फलंदाजांचा कर्दनकाळ' ट्रेंट बोल्टची निवृत्तीची घोषणा; तडकाफडकी घेतला निर्णय, IPLचे काय?
9
Nirjala Ekadashi 2024: आजच्या दिवशी न जेवताच पोटावरून हात फिरवत भीमाचे घ्या नाव; जाणून घ्या कारण!
10
"कोणाचा हात तर कोणाचा पाय तुटला; मदतीसाठी लोक जोरजोरात ओरडत होते, किंचाळत होते..."
11
एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण
12
Trent Boult चा क्रिकेटला रामराम! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भावूक
13
विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली, १० वर्षे लिव्ह इनमध्ये राहिली अन् नंतर मिळाला धोका
14
पावसाला दोष देऊ नका, पाकिस्तान जिंकण्यासाठी पात्र नव्हताच; 'वीरू'ने लायकी काढली
15
Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला गृहीणींनी शोधलेले पर्याय आणि भारुडकरांनी दिलेले शालजोडे; वाचा!
16
Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी
17
"सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा"; लक्ष्मण हाकेंचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही
18
मातृत्व विमा घेताना कोणती काळजी घ्यावी? कोणते लाभ मिळतात, कसा निवडाल प्लान? जाणून घ्या
19
बाप-लेकीचं नातं! आलियाने शेअर केला रणबीर आणि राहाचा क्यूट फोटो
20
विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी

२१ हजार भाविकांचे सामूहिक महापारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:56 PM

शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याचे साकडे घालण्यासाठी श्री संत गजानन महाराज भक्तपरिवार महापारायण सेवा समितीच्यावतीने २१ जानेवारी रोजी सकाळी ७ पासून रेवसा मार्गावरील श्रीगुरू गजाननधाम येथे एकाच वेळी २१ हजार भाविक ‘गजानन विजय’ ग्रंथाचे पारायण करणार आहेत.

ठळक मुद्देपत्रपरिषद : रेवसा मार्गावर एकदिवसीय आयोजन

आॅनलाईन लोकमतअमरावती : शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याचे साकडे घालण्यासाठी श्री संत गजानन महाराज भक्तपरिवार महापारायण सेवा समितीच्यावतीने २१ जानेवारी रोजी सकाळी ७ पासून रेवसा मार्गावरील श्रीगुरू गजाननधाम येथे एकाच वेळी २१ हजार भाविक ‘गजानन विजय’ ग्रंथाचे पारायण करणार आहेत. हे देशातील सर्वांत मोठे महापारायण राहणार असल्याचा विश्वास समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी कार्यक्रमस्थळी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला.महापारायण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आतापर्यंत राज्यभरातून १८ हजार तसेच अमरावती जिल्ह्यातून चार हजार भाविकांची नोंदणी झाली आहे. इतर राज्यांसह परदेशातूनही नोंदणी झाली आहे. शेगाव संस्थानच्या धर्तीवर पाच हजार सेवेकरी सेवा देणार आहेत. विशेष म्हणजे, १५० मुस्लीम सेवेकरी आहेत. यावेळी एक लाखापेक्षा जास्त भाविकांकरिता महाप्रसादाचे नियोजन समितीने केले आहे. ३९००० चौ. फुटाचा मंडप तयार करण्यात आला असून, एक लाख चौरस फुटाचे स्वयंपाकगृह तयार केले आहे.दोन लाख पाणी बॉटलदानदात्यांकडून दोन लाख पाणी बॉटल वितरित होतील. डॉक्टरांची चमू व अ‍ॅम्ब्यूूलन्स व्यवस्था राहणार आहे. पत्रपरिषदेला खा. आनंदराव अडसूळ, सुरेखा ठाकरे, ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रकाश साबळे, समितीचे सचिव सुधीर वाकोडे, शशिकांत पोकळे, जयवंत महल्ले, मनोज राऊत, रवि देशमुख, अजय जगताप, जयंत हरणे, जगदीश गुल्हाने, आशिष वानखडे, विजय पुंडकर, दीपक यादव, राजेश बहाळे, महेंद्र राऊत, उज्ज्वला देशमुख, शारदा टवाणी, भारती बजाज आदींची उपस्थिती होती. आरटीओ रामभाऊ गिते, एसडीओ इब्राहिम चौधरी, महापालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, कार्यकारी अभियंता मोहोड, ठाणेदार मनीष ठाकरे उपस्थित होते.शोभायात्रा २० जानेवारी रोजीविवेकानंद कॉलनी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरातून २० जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ‘श्रीं’ची शोभायात्रा निघणार आहे. रुक्मिणीनगर, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, पंचवटी, शेगाव नाका व नवसारीकडून रेवसा मार्गावरील गजानन धाम येथे शोभायात्रा पोहोचणार आहे. यामध्ये शेगाव, कोंडोलीसह अन्य ठिकाणांहून ५० दिंड्या व वारकरी शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.