शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

प्रेमासाठी ती झारखंडहून आली महाराष्ट्रात, फेसबुकवरून जुळले प्रेमसूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 20:42 IST

फेसबुकवरून झालेली ओळख प्रेमात बदलली आणि ती झारखंड राज्यातील अमरकंठक गावाहून महाराष्ट्रात पोहोचली.

बडनेरा : फेसबुकवरून झालेली ओळख प्रेमात बदलली आणि ती झारखंड राज्यातील अमरकंठक गावाहून महाराष्ट्रात पोहोचली. मात्र, रेल्वेत प्रवाशासोबत झालेल्या वादानंतर तिच्या प्रेमकथेचा भंडाफोड झाला. शनिवारी पहाटे हटीया एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या घटनेत बडनेरा जीआरपीएफने त्या तरुणीला ताब्यात घेतले.झारखंडच्या अमरकंठक गावातील एका मुलीची महाराष्ट्रातील नंदूरबार येथील विशिष्ट समुदयातील मुलाशी ओळख झाली. फेसबुकवर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्यामुळे चार वर्षांपासून ते फेसबुकवर संदेशाद्वारे संवाद साधत होते. त्यांनी एकमेकांना भेटण्याची इच्छा दर्शविली. त्या तरुणाने मुलीला नंदूरबारला येण्यास सांगितले. त्यानुसार ती मुलगी हटीया एक्सप्रेसने निघाली. शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास रेल्वेच्या  गेटजवळ ती उभी होती. ही बाब काही वेगळी वाटल्याने एका प्रवाशाने त्या मुलीला हटकले.  त्यावेळी तिने प्रेमकहाणी कथन केली. हे सांगताना तिचे अश्रू अनावर झाले आणि तिने परक्या प्रवाशाच्या खांद्यावर डोके ठेवून रडण्यास सुरुवात केली. हा प्रकार त्या परक्या प्रवाशाच्या पत्नीने पाहिला. आपल्या पतीच्या खांद्यावर रडणारी ती तरूणी कोण, ही बाब जाणून घेण्यासाठी ती महिला गेली असता, पती-पत्नीत शाब्दिक वाद झाला. पती,पत्नी व त्या मुलीचा वाद विकोपाला गेल्यानंतर त्या व्यक्तीने त्या मुलीसह पत्नीला मारहाण केली.  दरम्यान हा गोंधळ बडनेरा रेल्वे पोलिसांना कळला. पोलिसांनी त्या मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रेमप्रकरणाचा विषय पुढे आला. तिच्या प्रियकराशी पोलिसांनी संपर्क केला व मुलीच्या कुटुंबीयांना ठाण्यात येण्यासाठी निरोप दिला. शनिवारी दुपारपर्यंत त्या मुलीवर प्रेम करणारा तो तरुण दोन वकिलांना घेऊन ठाण्यात पोहोचला. उशिरा रात्रीपर्यंत पोलिसांनी चोकशी केली. मात्र, मुलीचे नातेवाईक बडनेरा रेल्वे पोलिसांपर्यंत पोहोचले नव्हते.