शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाचा गेली, पाय गेले, हात पडले लुळी, एकाच कुटुंबातील तिघांना विचित्र आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

शेतमजुरी करणारे विठ्ठल वझे यांना  दोन मुले. यश नऊ वर्षांचा, तर  नीलेश सात वर्षांचा. यशचा जन्म झाल्यानंतर   ते हसत-खेळत-रडत असत. त्यांच्या शरीराच्या सर्व  हालचाली होत होत्या. मात्र, दोन वर्षांचा होताच अचानकपणे बोलणे बंद झाले. त्याला धडपणे पायावर उभे राहणे जमत नव्हते. लगेच हातही लुळे  पडले. काही दिवसांतच खुर्चीवर बसायला शक्य झाले नाही. अखेर यशला बिछान्याचा आधार घ्यावा लागला. 

ठळक मुद्देपोटाची खळगी भरायची कशी? सामाजिक, शैक्षणिक प्रगती अशक्य

मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : जन्म झाल्यानंतर त्यांना रडता आले, कुणी पाहिले तर हसता आले, जन्मदात्यांना ओळखता  आले, मात्र जेव्हा चालण्यायोग्य झाले तेव्हा अवघ्या दोन वर्षांच्या वयात वाचा गेली. हात उचलणे बंद झाले. कंबरेपासून पाय लुळे पडले. आता तर कायमचे अपंगत्व आले आहे. अंथरुणापुरतेच त्यांचे आयुष्य सीमित झाले आहे. एकाच कुटुंबातील तिघांना हा विचित्र आजार जडला आहे.धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीकाठावरील अडीच हजार लोकवस्तीच्या दिघी महल्ले या गावी कुंभार बांधवांची आठ ते दहा कुटुंबे राहतात. यातील शेतमजुरी करणारे विठ्ठल वझे यांना  दोन मुले. यश नऊ वर्षांचा, तर  नीलेश सात वर्षांचा. यशचा जन्म झाल्यानंतर   ते हसत-खेळत-रडत असत. त्यांच्या शरीराच्या सर्व  हालचाली होत होत्या. मात्र, दोन वर्षांचा होताच अचानकपणे बोलणे बंद झाले. त्याला धडपणे पायावर उभे राहणे जमत नव्हते. लगेच हातही लुळे  पडले. काही दिवसांतच खुर्चीवर बसायला शक्य झाले नाही. अखेर यशला बिछान्याचा आधार घ्यावा लागला. प्रसूतिकाळातील चूक असेल, या भावनेतून दुसऱ्यांदा योग्य काळजी घेण्यात आली. मात्र, नीलेशचेदेखील दोन वर्षांचा होताच यशप्रमाणे बोलणे, चालणे, बसणे बंद झाले.

पोटाची खळगी भरायची कशी? विठ्ठल वझे व अमोल वझे आणि त्यांच्या पत्नींना शेतमजुरीवर गुजराण करावी लागते. दुसरीकडे मुलांचे विधी, ब्रशपासून निजेपर्यंत कुणीतरी जवळ असावेच लागते. आतापर्यंत त्यांनी अनेक दवाखाने केले. मात्र, आजार कोणता, हे लक्षात आले नाही. त्यातच उपचारासाठी पैसा उभा करायचा की पोटाची खळगी भरायची, हा प्रश्नही निर्माण झाला आहे.

सामाजिक, शैक्षणिक प्रगती अशक्ययश विठ्ठल वझे  आज तिसऱ्या वर्गात आहे. त्याला विशेष शिक्षक वैभव गवते घरी येऊन शिकवत आहेत. यश पूर्णतः मतिमंद असल्याने मूलभूत गरजा, स्वतःचे काम स्वतः करणे अशा सामाजिक तसेच  गोल काढणे, अक्षराची ओळख आदी शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न शक्य झाले नसल्याचे  गवते यांनी सांगितले. 

चुलतभाऊही झाला बहुविकलांगविठ्ठल वझे यांचा चुलतभाऊ अमोल वझे यांचा मुलगा आदित्यची स्थिती यश आणि नीलेशसारखी झाली आहे. वझे कुटूंबातील तिन्ही मुले आज बिछान्यावर आहेत.  त्याच्या औषधोपचारासाठी वझे कुटुंबाने आतापर्यंत बराच खर्च केला. मात्र, तो अंथरुणालाच खिळला आहे. 

प्रसूतीदरम्यान निष्काळजीपणा झाला, तर अपत्य मतिमंद जन्माला येऊ शकते. असे आजार आनुवंशिकतेमधून उद्भवतात. बहुविकलांगत्वावर  एखादेच वेळी उपचार शक्य होतो. - डॉ. ऋषीकेश घाटोळ, बालविकास तज्ज्ञ, अमरावती

 

टॅग्स :Healthआरोग्य